
Ahaan Panday Home: 18 जुलै रोजी प्रदर्शित झालेला सैयारा चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. एकीकडे चित्रपटाला जबरदस्त प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटाची कथा आणि अहान पांडेचं कौतुक करीत आहेत. अहान या चित्रपटातून डेब्यू करीत आहे. याशिवाय अहानने प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा तयार केली आहे. अयान पांडे हा चंकी पांडेचे भाऊ चिक्की पांडेचा मुलगा आहे.
चित्रपट पाहिल्यानंतर प्रेक्षक अहानचा अभिनय, त्याचा आवाज आणि लुक्सचं कौतुक करीत आहेत. यादरम्यान अहान पांडेशी संबंधित एक व्हिडिओ समोर आला आहे.

सोशल मीडियावर अहान पांडे याच्या आलिशान घराचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ २०२३ मध्ये त्याची बहीण अलाना पांडेने आपल्या युट्यूब चॅनलवर शेअर केला होता.

या व्हिडिओमध्ये अलाना पांडे हिने सांगितलं की, तिचा साखरपुडा, हळद आणि ब्रायडल शॉवरसारखे सर्व सोहळे याच घरात पार पडले. याशिवाय तिचं घर Amazon Prime च्या सीरिज The Tribe मध्येही दाखविण्यात आलं आहे.

घराबाहेर एक मोठं अंगण आहे. ज्यात एक लांब डायनिंग टेबल ठेवलं आहे. घरात बरीच रोपं-झाडं लावण्यात आले आहेत. अलानाने सांगितलं की, तिच्या वडिलांनी घरातच स्टाफसाठीही फ्लॅट्स तयार केले आहेत. ज्यामुळे सर्वजण आरामात राहू शकतात.

तिच्या वडिलांना सुरक्षेची चिंता असल्याने त्यांनी घरात अनेक कॅमेरे आणि फिंगरप्रिंट लॉक लावले आहेत. या व्हिडिओमध्ये अहान पांडे एक मजेशीर कॅमियो करतो, जो पाहून तुम्हालाही हसू आवरता येणार नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world