Pune News: सुपरस्टार धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर रोजी वयाच्या 89व्या वर्षी निधन झालं. आवडत्या कलाकाराचं अखेरचे दर्शन न मिळाल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला, त्यांनी नाराजीही व्यक्त केली. दुसरीकडे सिनेरसिकांना धर्मेंद्र यांना इक्कीस (Ikkis Movie) या सिनेमाच्या माध्यमातून शेवटचं मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे. काही दिवसांपूर्वी इक्कीस सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. निधनाच्या दिवशी त्यांचे दोन पोस्टर्सही निर्मात्यांनी रिलीज केले होते. यासंदर्भात NDTVशी बातचित करताना सिनेमाचे दिग्दर्शक श्रीराम राघवन यांनी सांगितलं की, धर्मेंद्र यांचं निधन त्यांच्यासाठी वैयक्तिक स्वरुपातील नुकसान आहे. इक्कीसच्या शुटिंगदरम्यान आम्ही सिनेमांबाबत चर्चा करायचो, अशा कित्येक आठवण त्यांनी सांगितल्या. धर्मेंद्र आणि श्रीराम राघवन जॉनी गद्दार सिनेमानंतर तब्बल 18 वर्षांनंतर पुन्हा एकत्र काम करत होते.
धर्मेंद्र यांच्या आठवणी
एनडीटीव्हीशी खास बातचीत करताना श्रीराम राघवन यांनी सांगितलं की, धर्मेंद्र यांचं निधन हे अतिशय खासगी स्वरुपातील नुकसान आहे. मी खूप खूश आहे की त्यांनी हा सिनेमा केला आणि खूप चांगलं काम केलंय. धर्मेंद्र यांनी डबसह सिनेमा पाहिलाय पण पार्श्वसंगीत, इफेक्ट्स आणि इतर सर्व गोष्टींसह सिनेमा पाहावा, अशी माझी इच्छा होती. पण जे आहे ते आहे.
शुटिंगसाठी कायम तयार असायचे धर्मेंद्र: श्रीराम राघवन
श्रीराम राघवन यांनी पुढे असंही सांगितलं की, इतक्या वर्षांनंतरही धर्मेंद्र यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नव्हता. वय थोडं वाढलं होतं, पण पूर्वीप्रमाणेच ते शानदार होते. त्यांचे कॅमेऱ्यावर आणि कॅमेऱ्याचंही त्यांच्यावर खूप प्रेम होते.
धर्मेंद्र आणि शेवटच्या सिनेमाचे पुणे शहराशी कनेक्शन
धर्मेंद्र यांचे शेवटच्या सिनेमाच्या निमित्ताने पुणे शहराशी संबंध आला होता. राघवन यांनी सांगितलं की, आम्ही चंदिगड, लखनौ, दिल्ली आणि पुणे शहरात सिनेमाचे शुटिंग केले. खूप सारे लोकेशन होते आणि हा सिनेमा स्टुडिओमध्ये चित्रित करण्यात आलेला नाही, त्यामुळे ती बाब सोपी नव्हती".
Ikkis Movie Trailer VIDEO
(नक्की वाचा: Dharmendra News: ना सनी ना बॉबी, ICUमधून धर्मेंद्र यांनी या हीरोच्या घरी केला होता फोन; हे झालं शेवटचं बोलणं)
शुटिंगनंतर धर्मेंद्र थकायचे : श्रीराम राघवनश्रीराम राघवन यांनी पुढे असंही सांगितलं की, "शुटिंग थोडेसं कठीण होते, त्यामुळे धर्मेंद्र थकायचे आणि कधीकधी आमचे वेळापत्रक अतिशय व्यस्त असायचे. मी त्यांना म्हणायचो सर सीनमध्ये आणखी एक शॉट आहे. ते लगेच म्हणायचे हा सांग ना. ते थकले आहेत, हे मला समजायचं, पण ते म्हणायचे की ठीक आहे, ठीक आहे, चला सीन शुट करूया आणि जेव्हा कॅमेरा सुरू व्हायचा तेव्हा त्यांचे चित्र एखाद्या जादुप्रमाणे दिसायचं, ते अविश्वसनीय होते".
धर्मेंद्र यांचा शेवटचा सिनेमा कधी रिलीज होणार?
धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले. याच दिवशी इक्कीस सिनेमातील त्यांचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. सिनेमामध्ये धर्मेंद्र ब्रिगेडियर एमएल खेत्रपालची भूमिका निभावत आहेत, जे 1971च्या युद्धाचे हीरो सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांचे वडील आहेत. या सिनेमामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदाचीही मुख्य भूमिका आहे. 25 डिसेंबर रोजी हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे.