Rekha Love Affairs Viral News: बॉलिवूडमध्ये सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक म्हणजे रेखा..ज्या अभिनेत्रीनं अख्ख्या फिल्म इंडस्ट्रीत तिच्या सौंदर्यासोबतच अभिनयाची छाप टाकली. अमिताभ बच्चन आणि रेखाच्या अफेअरच्या चर्चाही त्या काळात तुफान रंगल्या.तसच अभिनेते विनोद मेहरा आणि रेखाच्या प्रेमप्रकरणानेही अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि क्रिकेटपटू इमरान खान यांच्यासोबत रेखाचं अफेअर होतं की नाही? त्या दोघांचं लग्न का झालं नाही? याबाबत जाणून घ्या इनसाईड स्टोरी
इमरान खान ऑगस्ट 2018 ते एप्रिल 2022 या काळात पाकिस्तानचे 22 वे पंतप्रधान होते. इम्रान खान राजकीय नेते तर होतेच, पण पाकिस्तानच्या सर्वात प्रसिद्ध क्रिकेटपटूंमध्ये त्यांचा नावलौकीक होता.सर्वात देखण्या पुरुषांपैकी एक मानले जाणारे इमरान यांचे वैयक्तिक आयुष्य आणि लिंकअप्सही चर्चेत राहिले. इमरानचे नाव बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्रींसोबत जोडले गेले,ज्यात जीनत अमान,शबाना आझमी आणि इतर अभिनेत्रींचा समावेश आहे.पण रेखा आणि इम्रान खान यांच्यातील लिंक-अपच्या अफवांनी धुमाकूळ घातला होता. दरम्यान, इमरान खान यांची तुरुंगातच हत्या झाल्याच्या बातम्या नुकत्याच समोर आल्या होत्या. परंतु, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आली नाहीय.
नक्की वाचा >> KDMC News: कचऱ्यात सापडलेले सोन्याचे दागिने महिलेला केले परत, वाढदिवशीच महिलेच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले!
रेखा आणि इमरानची जवळीक
1980 च्या दशकात जेव्हा रेखा आणि इमरान यांच्या लिंक-अपच्या अफवा सुरू झाल्या.दोघांना अनेक वेळा एकत्र पाहिले गेले आणि त्यांच्या लव्ह स्टोरीने ग्लॅमर आणि क्रिकेटच्या जगात खूप चर्चा रंगवली.रेखा आणि इमरान मुंबईच्या बीचवर एकमेकांसोबत वेळ घालवत असत आणि तो शूटिंगवरही तिला भेटायला जात असे, अशा चर्चा होत्या.एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता की, इमरान आणि रेखा ‘शहरात फिरत होते'आणि एकमेकांच्या प्रेमात वेडे झाले होते.रिपोर्टनुसार, “ज्यांनी रेखा आणि इमरानला बीचवर एकमेकांसोबत एन्जॉय करताना पाहिले,ते सर्व थक्क झाले आणि त्यांना असं वाटलं की, दोघांमध्ये जीवापाड प्रेमसंबंध आहेत.
रेखाच्या आईला इमरानला बनवायचं होतं जावई
रिपोर्टमध्ये असा दावा करण्यात आला होता की रेखाची आई,पुष्पावली,इमरानसोबतच्या तिच्या नात्यामुळे खूप आनंदी होती. कारण तिला वाटत होते की इमरान हा तिच्या मुलीसाठी सर्वात योग्य पती आहे.इतकेच नव्हे तर पुष्पावली या नात्यासाठी खूप उत्सुक होत्या आणि यासाठी त्या एका ज्योतिषाकडेही गेल्या होत्या. “त्या दिल्लीला गेल्या होत्या. इमरान तिच्या मुलीसाठी (रेखा) आदर्श पती ठरू शकतो का, असा सल्लाही त्यांनी एका नजूमी नावाच्या ज्योतिषाकडून घेतला होता.नजूमीने काय सांगितले, हे उघड झालं नाही. पण इमरान हा रेखासाठी चांगला पती ठरू शकतो, असं रेखाच्या आईला वाटत होतं.
नक्की वाचा >> मैत्री आधी, क्रिकेट नंतर..स्मृती मंधानाच्या दु:खद काळात जेमिमा रॉड्रिग्जने घेतला सर्वात मोठा निर्णय
इमरान आणि रेखाचं लग्न का झाली नाही?
रेखा आणि इमरानचे लग्न होऊ शकले नाही,पण त्यामागचे कारण कधीच समोर आलं नाही.रेखाशिवाय इमरानचे नाव जीनत अमान आणि शबाना आझमी यांच्यासोबतही जोडले गेले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world