Ranbir Kapoor Investment: रणबीर कपूर बनला पुणेकर! मुळशीतील 'या' गावात खरेदी केली तब्बल 25 एकर जमीन

Ranbir Kapoor land investment in pune: अभिनेता रणबीर कपूरने अयोध्या येथील गुंतवणुकीनंतर आता पुण्यातील मुळशी तालुक्यात तब्बल 25 एकर जमीन खरेदी करत आपल्या रिअल इस्टेट पोर्टफोलिओचा मोठा विस्तार केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरने अयोध्येत एका आलिशान प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यानंतर, पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात कोट्यवधी रुपयांची जमीन खरेदी केली आहे. नोंदणी दस्तऐवजांनुसार, रणबीरने मुळशीतील पिंपरी गावात एकूण 25.7 एकर म्हणजेच सुमारे 1,04,000 चौरस मीटर जमीन आपल्या नावावर केली आहे, ज्यासाठी त्याने 16.42 कोटी रुपये मोजले आहेत.

4 वेगवेगळ्या भूखंडांचा खरेदीत समावेश

रिअल इस्टेट डेटा विश्लेषक संस्था 'सीआरई मॅट्रिक्स'ने (CRE Matrix) मिळवलेल्या कागदपत्रांनुसार, हा खरेदी व्यवहार 30 एप्रिल 2026 रोजी नोंदवला गेला आहे. यामध्ये पिंपरी गावातील लागोपाठ असलेल्या चार वेगवेगळ्या भूखंडांचा समावेश आहे. 

Advertisement
  • पहिला भूखंड: सर्वात मोठा भूखंड 43,800 चौरस मीटरचा असून, तो 7.07 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आला.
  • दुसरा भूखंड: 29,900 चौरस मीटरचा हा प्लॉट 4.62 कोटी रुपयांना घेण्यात आला.
  • तिसरा भूखंड: 21,400 चौरस मीटरच्या जमिनीसाठी 3.31 कोटी रुपये मोजण्यात आले.
  • चौथा भूखंड: सर्वात लहान 8,900 चौरस मीटरचा तुकडा 1.39 कोटी रुपयांना खरेदी केला गेला.

एकत्रितपणे या चारही भूखंडांचे क्षेत्रफळ 25.7 एकर होते आणि या संपूर्ण व्यवहारासाठी रणबीर कपूरने 82.13 लाख रुपयांचे मुद्रांक शुल्क सरकारला भरले आहे.

(नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

अयोध्येतील 'द सरयू' प्रोजेक्टमध्येही मोठी गुंतवणूक

रणबीर कपूरची ही पहिलीच मोठी गुंतवणूक नाही. नुकतेच मे 2026 मध्ये 'द हाऊस ऑफ अभिनंदन लोढा' या नामांकित कंपनीने जाहीर केले होते की, रणबीरने अयोध्येतील त्यांच्या 'द सरयू' या अत्यंत प्रतिष्ठित प्रोजेक्टमध्ये 3.31 कोटी रुपयांचा भूखंड खरेदी केला आहे.

सरयू नदीच्या काठावर विकसित होत असलेल्या 75 एकरच्या या टाऊनशिपमध्ये रणबीरने 2,134 चौरस फुटांचा प्लॉट घेतला आहे. या भव्य प्रोजेक्टमध्ये एक आलिशान क्लबहाऊस, 35 पेक्षा जास्त अत्याधुनिक जीवनशैली सुविधा आणि 'द लीला' समूहाद्वारे चालवले जाणारे 5 एकरचे पूर्णपणे शाकाहारी लक्झरी हॉटेल असणार आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

(नक्की वाचा-  IMD Rain Alert: महाराष्ट्र पाऊस कधी परतणार? मान्सूनबाबत मोठी अपडेट; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज)

मुंबईबाहेर सेलिब्रिटींची पावले

बॉलिवूड स्टार केवळ मुंबईपुरते मर्यादित न राहता अलिबाग, लोणावळा, पुणे आणि गोवा यांसारख्या शहरांकडे वळत आहेत. सेलिब्रिटी आपल्या पोर्टफोलिओमध्ये विविधता आणण्यासाठी शेतजमीन, बिगरशेती जमीन, हॉलिडे होम्स आणि प्रीमियम निवासी प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पैसा गुंतवत आहेत. रणबीर व्यतिरिक्त अमिताभ बच्चन, कार्तिक आर्यन, कृती सॅनन, आणि क्रीडा क्षेत्रातील दिग्गज विराट कोहली व अनुष्का शर्मा यांनीही देशातील विविध भागांत अशाच प्रकारच्या प्रीमियम रिअल इस्टेट प्रोजेक्ट्समध्ये मोठी गुंतवणूक केली आहे.
 

Advertisement

Topics mentioned in this article