जाहिरात

Rashmika Vijay: लग्नाची मिठाई तुमच्या शहरात येणार का? विजय-रश्मिकाचा मोठा प्लॅन, 22 शहरांची यादी जाहीर

दरम्यान, त्यांच्या 'राणाबाली' चित्रपटातील लग्नाचे गाणेही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

Rashmika Vijay: लग्नाची मिठाई तुमच्या शहरात येणार का? विजय-रश्मिकाचा मोठा प्लॅन, 22 शहरांची यादी जाहीर
  • विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदानाच्या लग्नानिमित्त देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये अन्नदान करण्यात येणार आहे
  • या नवदाम्पत्याने २२ शहरांमध्ये मिठाईचे वाटप करण्याचा अनोखा निर्णय घेतला आहे
  • विजय-रश्मिकाचा आगामी ‘राणाबाली’ चित्रपट 1850 च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

दाक्षिणात्य सुपरस्टार विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांच्या लग्नाची सध्या देशभरात चर्चा आहे. आपल्या आयुष्यातील या आनंदाच्या क्षणात चाहत्यांना सहभागी करून घेण्यासाठी या जोडीने एक अनोखा निर्णय घेतला आहे. रविवारी देशभरातील प्रमुख मंदिरांमध्ये 'अन्नदान' करण्यात येणार असून 22 शहरांमध्ये मिठाईचे वाटप केले जाणार आहे. विजय आणि रश्मिकाने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती शेअर करत चाहत्यांचे आशीर्वाद मागितले आहेत. या दोघांचे नुकतेच राजस्थानमध्ये लग्न झाले होते. त्यानंतर हे नवदाम्पत्य हैदराबादला परतले आहे. 

लग्नाच्या या वातावरणात त्यांच्या आगामी 'राणाबाली' या चित्रपटाच्या निर्मात्यांनी 'एंधय्या सामी' या गाण्याची झलक प्रदर्शित केली आहे. हा चित्रपट 1850 च्या दशकातील सत्य घटनांवर आधारित आहेत. विजय यात राणाबालीची तर रश्मिका त्याच्या पत्नीची म्हणजेच जयम्माची भूमिका साकारत आहे. 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉमरेड' नंतर लग्नानंतरचा हा त्यांचा एकत्र येणारा पहिला चित्रपट ठरेल. या दोघांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरते. त्यांचा मोठा चाहता वर्ग संपूर्ण भारतात आहे. 

नक्की वाचा - ज्या हॉटेलमध्ये रश्मिका-विजयचं शाही लग्न झालं, तिथलं एका रात्रीचं भाडं किती? किंमत ऐकून धक्का बसेल

चाहत्यांची लाडकी जोडी विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना आता विवाहबंधनात अडकले असून, या आनंदात त्यांनी संपूर्ण देशाला सहभागी करून घेतले आहे. त्यामुळे ते देशातील 22 शहरांत मिठाई वाटणार आहेत. या शहरांमध्ये  हैदराबाद, मुंबई, दिल्ली, नोएडा, चंदीगड, गाझियाबाद, अहमदाबाद, भोपाळ, जयपूर, कोची, बंगळुरू, चेन्नई यांसह विशाखापट्टणम, विजयवाडा आणि म्हैसूर या शहरांचा या यादीत समावेश आहे. या जोडीच्या दिलदारपणाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. 

नक्की वाचा - Rashmika Vijay Wedding: विजय-रश्मिकाच्या लग्नाचे 'महाभारत' कनेक्शन काय? 2 वर्षापूर्वीचं आहे प्रकरण

दरम्यान, त्यांच्या 'राणाबाली' चित्रपटातील लग्नाचे गाणेही सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. "आमच्या प्रवासात तुम्ही नेहमीच सोबत होतात, आता सेलिब्रेशनमध्येही सोबत राहा," असे म्हणत त्यांनी देशातील 22 शहरांमध्ये मिठाई आणि अन्नाचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या जोडीचा आगामी 'राणाबाली' हा चित्रपट 1850 मधील अशा घटनांवर आधारित आहे ज्यांचा इतिहास पुस्तकांत नोंदवला गेला नाही. यामध्ये हॉलिवूड अभिनेता अर्नोल्ड वोसलू खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com