Raja Shivaji Movie: छावा सिनेमानंतर आता मराठा साम्राज्याशी संबंधित आणखी एक सिनेमा सिनेरसिकांना पाहायला मिळणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याच्या कहाणींवर आधारित 'राजा शिवाजी' नावाचा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. रितेश देशमुख या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. बुधवारी (21 मे 2025) 'राजा शिवाजी' सिनेमाचे मोशन पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. या सिनेमामध्ये चार मराठी अभिनेते मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, जितेंद्र जोशी आणि अमोल गुप्ते हे मराठमोळे कलाकार सिनेमामध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडत आहेत.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
या कलाकारांच्या व्यतिरिक्त सिनेमामध्ये अभिषेक बच्चन,संजय दत्त, भाग्यश्री, फरदीन खान आणि जिनिलिया देशमुख यांच्याही मुख्य भूमिका आहेत.
(नक्की वाचा: 'बालक पालक' सिनेमा फेम मराठी अभिनेत्रीचे बोल्ड फोटोशूट)
रितेश देशमुख साकारणार महत्त्वाची भूमिका
रितेश देशमुखसह सिनेमातील सर्वच कलाकारांनी आपापल्या सोशल मीडिया हँडलवर 'राजा शिवाजी' (Raja Shivaji Movie) सिनेमाचे मोशन पोस्टर शेअर केले आहे. सिनेमामध्ये रितेश देशमुख स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांची भूमिका साकारत आहे. 'राजा शिवाजी' सिनेमा 1 मे 2026 रोजी बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. सिनेमातील रितेश देशमुखचा पहिला लुक रिलीज करण्यात आलाय. बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित राजा शिवाजी सिनेमा पाहण्यासाठी सिनेरसिक आतुर झाले आहेत. पण प्रेक्षकांना वर्षभर प्रतीक्षा करावी लागणार आहे.
(नक्की वाचा: Aarya Aambekar: आर्या आंबेकरचा जपानी डॉल लुक पाहिला का?)
राजा शिवाजी सिनेमा मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये रिलीज होणार आहे.