
Madhoo Shah News: 'रोजा' आणि 'फूल और कांटे' सिनेमातील अभिनेत्री मधु तुम्हाला आठवतेय का? मधुने साउथ फिल्म इंडस्ट्रीमधील दिग्गज दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या 'रोजा' सिनेमामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. मधुने आता वयाची पन्नाशी ओलांडलीय. पण अभिनेत्री म्हणून ती आजही सिनेमांमध्ये काम करते. स्वतःचे करिअर यशाच्या शिखरावर असताना तिने लग्न करून सिनेसृष्टीला अलविदा म्हटले होते. मनासारख्या भूमिका मिळत नसल्याने विश्रांती घेणे योग्य वाटले, असा खुलासाही तिने कालांतराने केला होता. मधुने तमिळ भाषिक सिनेमाद्वारे अभिनय क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं होते आणि आजही साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करतेय.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मधु ही हेमा मालिनी यांची भाची आहे. सोशल मीडियावरही ती सक्रिय आहे. स्वतःच्या मुलींसोबतचे फोटो ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. मधुने तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये जुळ्या मुलींचा फोटो शेअर केलाय. तिच्या दोन्ही मुली हीरोइनप्रमाणेच सुंदर आहेत. लेटेस्ट फोटोमध्ये मायलेकीने लेहंगा परिधान केल्याचे दिसतंय. दोघींचाही लुक प्रचंड सुंदर दिसतोय. फोटोवर चाहत्यांनी लाइक आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय.
(नक्की वाचा: Kartiki Gaikwad Son Video: गायिका कार्तिकी गायकवाडच्या लाडक्या लेकाची पहिली झलक, हे आहे बाळाचे नाव)
(नक्की वाचा: मेरे हाथ में तेरा हाथ हो! आमिरची गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात हजेरी)
मधु सध्या काय करते?
मधु नात्यामध्ये जुही चावलाची भावजय लागते. जुही आणि मधुचे पती एकमेकांचे चुलत भाऊ आहेत. हिंदी सिनेमातील ड्रीम गर्ल हेमा मालिनी मधुची आत्या आहे. कामासंदर्भात सांगायचे झाल्यास विजय राज आणि श्रेयस तळपदे स्टारर सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा 'कर्तम भुगतम' (2024) मध्ये मधु झळकली होती. 2025मध्ये ती विष्णु मंचू, अक्षय कुमार आणि प्रभासचा सिनेमा 'कन्नपा'मध्येही दिसणार आहे. 'दिलजले', 'नीलगिरी', 'जेंटलमॅन' आणि 'एलान' यासारख्या गाजलेल्या सिनेमांमध्येही मधुने काम केलंय.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world