जाहिरात

Kartiki Gaikwad Son Video: गायिका कार्तिकी गायकवाडच्या लाडक्या लेकाची पहिली झलक, हे आहे बाळाचे नाव

Kartiki Gaikwad Son First Glimpse: प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड आणि तिचे पती रोनित पिसे यांनी त्यांच्या लाडक्या लेकाची पहिली झलक सोशल मीडियावर शेअर केली आहे. पाहिला का व्हिडीओ?

Kartiki Gaikwad Son Video: गायिका कार्तिकी गायकवाडच्या लाडक्या लेकाची पहिली झलक, हे आहे बाळाचे नाव
Kartiki Gaikwad Son First Glimpse: कार्तिकी गायकवाडने मुलाचे काय ठेवले आहे नाव?

Kartiki Gaikwad Son First Glimpse: 'सारेगमप लिटिल चॅम्प्स'(Sa Re Ga Ma Pa L'il Champs) या रिअ‍ॅलिटी शोच्या पहिल्या पर्वाची विजेती आणि गायिका कार्तिकी गायकवाडच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कार्तिकीने तिच्या लाडक्या लेकाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केलीय. कार्तिकीने 14 मे 2024 रोजी मुलाला जन्म दिला होता. तेव्हापासून तिने मुलाचा फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणं टाळलं होतं. पण आवडत्या गायिकेचा मुलगा कसा दिसतो, हे पाहण्यासाठी चाहते प्रचंड आतुर झाले होते. अखेर 11 महिन्यांनंतर कार्तिकीने खास अंदाजामध्ये मुलाची पहिली झलक चाहत्यांसोबत शेअर केलीय.

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: Kartiki Gaikwad Insta And You Tube Channel

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाळासाठी चित्रित केला गाण्याचा व्हिडीओ

कार्तिकीने 'नीज बाळा' ही अंगाई मुलासाठी लिहिली आणि गायली सुद्धा आहे.  बाळाचे मामा कौस्तुभ गायकवाडने या अंगाईच्या संगीताचे नियोजन केले आहे. या अंगाईच्या माध्यमातून कार्तिकीचे बाळ तुमच्या भेटीला आले आहे. कार्तिकीने तिच्या अधिकृत यू-ट्युब चॅनेलवर हे अंगाई गीत लाँच केले आहे. गाण्याचे निर्माते पंडित कल्याण गायकवाड आहेत. 

Gulkand Movie : समीर सईला म्हणतोय 'चल जाऊ डेटवर...'; 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं रिलीज  

(नक्की वाचा: Gulkand Movie : समीर सईला म्हणतोय 'चल जाऊ डेटवर...'; 'गुलकंद' सिनेमातील नवं गाणं रिलीज)

कार्तिकीच्या मुलाचे नाव काय आहे? 

कार्तिकी गायकवाडने 14 मे 2024 रोजी तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला. ही गोड बातमी तिने सोशल मीडियाद्वारे चाहत्यांना दिली. पण यानंतर तिने बाळाचे नाव किंवा त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करणे कटाक्षाने टाळलं होते. त्यामुळे कार्तिकीने बाळाचे नाव काय ठेवले आहे, हे देखील जाणून घेण्यास चाहते उत्सुक होते. 'बाळाचा चेहरा कधी दाखवणार आहेस, आम्ही वाट पाहतोय', अशा कमेंट्स चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्टवर केल्या होत्या. अखेर 'नीज बाळा' अंगाईच्या माध्यमातून बाळाचा चेहरा आणि त्याचे नाव सुद्धा समोर आले आहे. कार्तिकने बाळाचे नाव 'रिशांक'असे ठेवले आहे. 

वर्ष 2020मध्ये कार्तिकी गायकवाडने (Kartiki Gaikwad) रोनित पिसे (Ronit Pise) यांच्याशी विवाह केला आणि लग्नाच्या चार वर्षांनंतर कार्तिकी आणि रोनित आईबाबा झाले आहेत. 

(नक्की वाचा: मेरे हाथ में तेरा हाथ हो! आमिरची गर्लफ्रेंड गौरीसोबत पहिल्यांदाच कार्यक्रमात हजेरी)

कार्तिकी गायकवाडच्या बाळाची पहिली झलक, पाहा व्हिडीओ