Saif Ali khan : जलद रिकव्हरी, रिक्षाने प्रवास, हल्ल्याबाबत संशय; सैफ अली खानने लोकांना पडलेल्या प्रत्येक प्रश्नाचं दिलं उत्तर

Saif Ali khan Interview : सैफ अली खानच्या प्रकृतीत झपाट्याने झालेली सुधारणा, रुग्णालयात रिक्षाने जाणे अशा गोष्टींवरुन त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशय व्यक्त केला जात होता. सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत.

जाहिरात
Read Time: 3 mins

अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्यानंतर तो काही दिवसातच त्यातून सावरला. मात्र अनेक असे प्रश्न आहेत ते अनुत्तरित आहेत. सैफ अली खानवर झालेला हल्ला, त्याच्या प्रकृतीत झपाट्याने झालेली सुधारणा, रुग्णालयात रिक्षाने जाणे अशा गोष्टींवरुन त्याच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी संशय व्यक्त केला जात होता. सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले जात आहेत. या सर्व प्रश्नांची सैफ अली खानने 'टाईम्स ऑफ इंडिया'ला दिलेल्या मुलाखतीत सविस्तर उत्तरे दिली आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रुग्णालयात ऑटो रिक्षाने का गेला? 

हल्ला झाला त्या रात्री सैफ लीलावती रुग्णालयात ऑटो रिक्षाने का गेला? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावर सैफने सांगितलं की, "ड्रायव्हर घरी नव्हता. रात्रभर इथे कोणीच राहत नाही. प्रत्येकाचं घर आहे, त्यामुळे त्यांना घरी जायचं असतं. आमच्या घरात काही लोक राहतात, पण ड्रायव्हर राहत नाहीत. जर रात्री बाहेर जायचं असेल किंवा काही गरज असेल त्यांना थांबायला सांगतो. जर मला गाडीच्या चाव्या सापडल्या असत्या तर मी गाडी चालवली असती. सुदैवाने चाव्या सापडल्या नाहीत. कारण मला जास्त हालचाल करायला नको होती. तसेच ड्रायव्हरला बोलावलं असतं तर त्याला पोहोचण्यासाठी वेळ लागला असता. म्हणूनच मी ऑटो रिक्षाचा पर्याय निवडला."

(नक्की वाचा-  Kareena Kapoor: सैफ अली खान आणि करीना कपूरचा घटस्फोट? बेबोच्या क्रिप्टिक पोस्टने खळबळ!)

मला ते अपेक्षित होते

सैफ अली खानच्या प्रकृतीत झपाट्याने झालेल्या सुधारणेबाबतही अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. रुग्णालयात पाच दिवसात दोन शस्त्रक्रिया झाल्यानंतर सैफ काही न झाल्यासारखाच रुग्णालयातून बाहेर पडला होता. तसेच दोन आठवड्यांनंतर चित्रपटाच्या प्रमोशनाच्या कार्यक्रमातही दिसला होता. त्यावर तो म्हणाला की, "मला वाटतं की अशा गोष्टीवर सर्व प्रकारच्या प्रतिक्रिया येणे अपेक्षित आहे. काही लोक त्याची थट्टा करतील. काही लोक त्यावर विश्वास ठेवणार नाहीत. मला वाटते की ते ठीक आहे कारण हीच जगाची खासियत आहे. जर प्रत्येकाने एखाद्या गोष्टीबद्दल सहानुभूतीपूर्ण प्रतिक्रिया दिली तर ते कंटाळवाणं असेल. मला ते अपेक्षित होते आणि त्यावर प्रतिक्रिया देण्याची गरज नाही."

रुग्णालयात पोहोचायला उशीर का झाला?

सैफला रुग्णालयात पोहोचण्यासाठी दीड तास का लागला यावरुनही काही प्रश्न उपस्थित केला जात आहेत. मात्र सैफने रुग्णालयात पोहोचण्यासाठी उशीर झाला नसल्याचे स्पष्ट केले. हल्ल्यानंतर मी लगेचच खाली आलो. करिनाने अनेकांना कॉल केले, मात्र कुणीची फोन उचलला नाही. त्यानंतर लगेचच मला रिक्षा मिळाली आणि मी लीलावती रुग्णायात पोहोचलो.

Advertisement

(नक्की वाचा - Aarushi Pokhriyal Nishank : बॉलिवूड प्रेम पडलं महागात; माजी मुख्यमंत्र्यांच्या देखण्या मुलीला 4 कोटींचा चुना)

घरात बंदुक नव्हती का? 

घरात बंदुक नव्हती का? यावर सैफने म्हटलं की, मला वाटते घरात लहान मुले आहेत. लहान मुलेही त्यासोबत खेळतील. कुणी बंदुक हातात घेतली तरी इतर समस्या उद्भवू शकतात.  माझे वडील बेडजवळ बंदूक घेऊन झोपायचे. पण कधीकधी, मला वाटते की बंदूक असल्याने अपघात होऊ शकतो. त्यामुळे घरी कोणतेही शस्त्रे ठेवलेले नाहीत. काही तलवार आहेत ज्या सजावटीच्या आहेत. 

Topics mentioned in this article