अभिनेता सैफ अली खान याच्यावर (Actor Saif Ali Khan Attack) मध्यरात्री २ च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथील सद्गुरू सरण (Actor Saif Ali Khan New Home ) इमारतीतील त्याच्या राहत्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. या हल्ल्यात तो जबर जखमी झाला असून त्याच्यावर सहावेळा वार करण्यात आले असून मणक्याजवळ खोल जखम झाल्याची माहिती आहे. सैफचं राहतं घर सद्गुरू सरण येथे चोरी करण्याच्या उद्देशाने अज्ञात शिरले होते. यावेळी चोराने सैफवर (Saif Ali Khan Home) हल्ला केल्याची माहिती आहे. सध्या सैफला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. (Saif-Kareena Home)
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
नेमकं रात्री काय घडलं?
* रात्री अडीचच्या सुमारास हा प्रकार घडला
* मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सैफ अली खान याच्या वांद्रे पश्चिमेकडून सद्गुरू सरण या इमारतीतील घरात बुधवारी रात्री एक चोर शिरला होता
* चोराला पाहून सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड सुरू केला
* त्यावेळी सैफ अली खानला जाग आली
* खोलीतून बाहेर आल्यानंतर सैफ अली खान आणि चोर आमनेसामने आले
* यावेळी पकडलं जाण्याच्या भीतीनं चोराने त्याच्याकडील चाकूने सैफ अली खानवर सपासप वार केले
* मुंबई पोलिसांनी या घटनेची गंभीरतेनं दखल घेतली असून चोराला शोधण्यासाठी मुंबई गुन्हे शाखेचे पथक कामाला लागलं आहे
नक्की वाचा - Prithvik Pratap : नुकतंच लग्न झालेल्या पृथ्वीक प्रतापला बायकोने काढले घराबाहेर, व्हिडीओ व्हायरल
लीलावती रुग्णालयाचे सीईओ निरज उत्तमानी म्हणाले, सैफ अली खानला पहाटे 3-30 वाजता लीलावती (रुग्णालयात) आणण्यात आले. त्याला सहा जखमा असून त्यापैकी दोन खोल आहेत. एक जखम त्याच्या मणक्याच्या जवळ आहे. आम्ही त्याच्यावर ऑपरेशन करत आहोत. न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन भूलतज्ज्ञ निशा गांधी यांच्याकडून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतरच नुकसान किती आहे हे सांगता येईल.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world