Saiyaara Box Office Collection day 2: सध्या सर्वत्र अहान पांडेच्या 'सैयारा' या पदार्पणाच्या चित्रपटाची चर्चा आहे. अहान आणि अनीत पड्डा यांच्या जोडीचे कौतुक होत आहे. तर चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. चित्रपटाच्या पहिल्या दिवसाच्या कमाईने बॉक्स ऑफिसवर त्सुनामी आणली. आश्चर्याची बाब म्हणजे, दुसऱ्या दिवसाचे आकडे पहिल्या दिवसापेक्षाही जास्त आहेत. ज्यामुळे आमिर खानचा मुलगा जुनैद खानच्या 'लवयापा' या पदार्पणाच्या चित्रपटाचे एकूण कलेक्शनही मागे पडले आहे.
बॉक्स ऑफिस ट्रॅकर सैकनिल्कच्या सुरुवातीच्या आकडेवारीनुसार, 'सैयारा'ने पहिल्या दिवशी ₹21 कोटींची ओपनिंग केली होती. त्यानंतर या चित्रपटाची भारतातील कमाई ₹24 कोटींपर्यंत पोहोचली. यासह, चित्रपटाने अवघ्या दोन दिवसांत ₹45 कोटींचे कलेक्शन केले आहे. तर जागतिक कलेक्शन दोन दिवसांत ₹50 कोटींच्या पुढे गेले आहे. ज्यामुळे 'सैयारा' 2025 च्या हिट चित्रपटांमध्ये गणला जात आहे.
मोहित सूरी यांनी 'सैयारा'चे दिग्दर्शन केले आहे, ज्यांनी 'जहर', 'कलयुग', 'वो लम्हे', कल्ट-क्लासिक आणि ब्लॉकबस्टर 'आशिकी 2' यांसारखे हिट चित्रपट दिले आहेत. यशराजचे सीईओ अक्षय विधानी निर्मित 'सैयारा'मध्ये अहान पांडे आणि अनीत पड्डा मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. जेन झेड स्टार किड्समध्ये हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी पदार्पण मानला जात आहे. यापूर्वी खुशी कपूर आणि जुनैद खानचा 'लवयापा', वेदांग रैनाचा 'जिगरा' आणि राशा थडानीचा 'आजाद' बॉक्स ऑफिसवर विशेष कमाल दाखवू शकले नव्हते.
नक्की वाचा - Shahrukh Khan: अभिनेता शाहरुख खान जखमी, उपचारासाठी थेट अमेरिकेला रवाना, असं काय घडलं?
चित्रपटाची कथा कृष कपूर (अहान) आणि गीतकार सिया (अदिती) यांची आहे. ज्यांची भेट म्यूझिकमुळे होते. नंतर पुढे त्यांच्यात प्रेम होते. पण एका अपघातामुळे सर्व काही बदलते. ज्यामुळे सिया तिचे जुने आयुष्य विसरते.'सैयारा'ने केवळ बॉक्स ऑफिसवरच चांगली सुरुवात केली नाही, तर त्याला सोशल मीडिया आणि प्रेक्षकांकडूनही जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. थिएटरमधून बाहेर पडताना प्रेक्षकांनी चित्रपटाचे संगीत, सिनेमॅटोग्राफी आणि अहान-अदितीच्या केमिस्ट्रीचे भरभरून कौतुक केले आहे.