
Salman-Aishwarya: बॉलिवूडची सर्वात चर्चित आणि अधुरी राहिलेली जोडी म्हणजे सलमान खान आणि ऐश्वर्या राय. 'हम दिल दे चुके सनम' (1999) च्या सेटवर बहरलेले त्यांचे प्रेम केवळ काही वर्षांतच संपुष्टात आले. ऐश्वर्या आज विवाहित असून एका मुलीची आई आहे, तर सलमान खान अद्याप अविवाहित आहे. सलमानच्या आयुष्यात अनेक सुंदरी आल्या पण त्यानं अद्याप कुणाशी लग्न केलेलं नाही. सलमान आणि ऐश्वर्या आजही एखाद्या कार्यक्रमासाठी एका छताखाली येतात त्यावेळी सर्वांना जुने प्रसंग आठवतात.
सलमान-ऐश्वर्याच्या 'हम दिल दे चुके सनम' चित्रपटाच्या सेटवरील एक थ्रोबॅक व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. या क्लिपमध्ये सलमान आणि ऐश्वर्या एकमेकांसोबत खूप सहज (Comfortable) आणि आनंदी दिसत आहेत. त्यांच्यातील ही केमिस्ट्री पाहून, त्यांचे ते प्रेम केवळ चित्रपटातील अभिनय होते की त्यांच्यात खरी मैत्री होती, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.
काय आहे Video?
या क्लिपमध्ये सलमान आणि ऐश्वर्याची अप्रतिम केमिस्ट्री दिसत आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा चित्रपट त्यांच्या दोघांची एकत्र आलेली शेवटची जोडी होती. सेटवर ते दोघे किती मोकळेपणाने वावरत होते, याचे दर्शन या व्हिडिओमध्ये घडते.
इथे पाहा संपूर्ण Video
सलमान खान रडत असे....
प्रसिद्ध गीतकार समीर अंजान यांच्या ताज्या खुलाशानुसार, ऐश्वर्यासोबतच्या ब्रेकअपनंतरचा काळ सलमानसाठी खूप कठीण होता. 'तेरे नाम' (2003) च्या शूटिंगदरम्यान ते 'क्यों किसी को वफा के बदले वफा नहीं मिलती' हे गाणे ऐकून ढसाढसा रडत असे. हे गाणे सलमानच्या दुःखी प्रेम कहाणीवर आधारित होते, असा दावाही त्यांनी केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world