सुपरस्टार सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी 'बॅटल ऑफ गलवान' (Battle of Galwan) या चित्रपटासाठी जीवतोड मेहनत करत आहे. सलमान खानचे लेटेस्ट फोटो व्हायरल झाले असून त्यामध्ये त्याने केलेले बदल स्पष्टपणे दिसून येत आहेत. आज आपण त्याच्या या फोटोंबद्दल नाही, तर या भूमिकेसाठी तो करत असलेल्या जीवतोड मेहनतीबद्दल जाणून घेणार आहोत. वर्षाच्या सुरुवातीला व्हँकुव्हरमध्ये (Vancouver) एका कार्यक्रमात सलमान खान सुटलेल्या पोटामुळे बेढब दिसत होता. त्याला 'बॉडी शेमिंग'चा सामना करावा लागला होता. यानंतर त्याने नव्या चित्रपटासाठी कसून मेहनत करायला सुरूवात केली असून त्याचे नवे रुप यामुळे पाहायला मिळू लागले आहे.
( नक्की वाचा: सलमान खान या 3 गंभीर आजारांनी ग्रस्त, 'कपिल शर्मा शो'मध्ये केला खुलासा )
'मिड-डे' वृत्तपत्राने एक बातमी प्रसिद्ध केली असून यात म्हटलंय की, सलमान खान (Salman Khan) त्याच्या आगामी चित्रपटात सैनिकाची भूमिका साकारत असून, त्यासाठी तो अत्यंत कठोर मेहनत (strict routine) घेत आहे. या बातमीत म्हटले आहे की, "सलमान आठवड्यातून 6 दिवस 'हाय-इंटेंसिटी इंटरव्हल ट्रेनिंग' (HIIT) सोबतच 'वॉल्यूम सेट' करत आहे. यात तो प्रत्येक सेशनमध्ये एका मसल ग्रुपवर लक्ष केंद्रित करत आहे."
( नक्की वाचा: मैंने प्यार किया कितीदा पाहिलाय? 'या' 5 गोष्टी माहिती आहेत का? सलमानचं सत्य समजल्यावर बसेल धक्का )
असेही समजते आहे की, "शरीरातील पाण्याची कमतरता आणि फॅटस् कमी करण्याची प्रक्रिया वेगाने व्हावी यासाठ तो एयर कंडीशनर किंवा पंख्याशिवाय व्यायाम करतोय. त्याचे व्यायामाचे प्रत्येक सेशन 1 तासाचे असते, ज्यात रेसिस्टन्स वर्कआउटसोबतच आउटडोर कार्डिओचाही समावेश असतो." सलमान खानच्या (Salman Khan) आहारातही बदल करण्यात आले आहेत. सलमान रोज कटाक्षाने घरून आलेलाच डबा खातो. कमी प्रोटीन असलेले पदार्थ, भाज्या आणि दिवसातून फक्त 1 चमचा भात असा त्याचा आहार असतो. त्याने प्रोसेस्ड कार्ब्स आणि दारू पूर्णपणे बंद केली आहे.