
Salman Khan News : अभिनेता सलमान खानच्या फिटनेसची नेहमीच चर्चा होता. मात्र सलमान खान अनेक आजारांना ग्रस्त असल्याने स्वत: सलमाननेच सांगितलं आहे. तंदुरुस्त दिसत असूनही त्याला अनेक गंभीर आरोग्य समस्या आहेत. आरोग्याच्या अनेक आव्हानांना न जुमानता तो सतत काम करत आहे.
द ग्रेट इंडियन कपिल शोच्या नवीन सीझनमध्ये पहिला गेस्ट म्हणून आलेल्या सलमानने कार्यक्रमादरम्यान त्याच्या आरोग्याच्या समस्यांबद्दल चर्चा केली. सलमानने म्हटलं की, मला ट्रायजेमिनल न्यूराल्जिया, ब्रेन एन्युरिझम आणि एव्ही मालफॉर्मेशन या सारख्या गंभीर समस्या आहेत. तरीही मी काम करत आहे. आरोग्याशी संबंधित अनेक प्रकारची आव्हाने तुमच्यासमोर सतत असतात, परंतु तुम्हाला काम करत राहावे लागते. सलमानने 2017 मध्ये एका कार्यक्रमादरम्यान देखील ट्रायजेमिनल न्यूराल्जियाबद्दल सांगितले होते.
ट्रायजेमिनल न्यूरॅल्जिया: या आजारामुळे चेहऱ्याच्या नसा सुजतात, ज्यामुळे असह्य वेदना होतात. याला 'सुसाईड डिजिज' असेही म्हणतात. कारण या वेदनेमुळे बरेच लोक मानसिक तणावात जातात. सलमानने 2017 मध्ये 'ट्यूबलाईट'च्या प्रमोशन दरम्यान सांगितले होते की, वेदना इतक्या भयानक आहेत की त्यालाही एकेकाळी हे सगळं असह्य झालं होतं. पण त्याने हिंमत दाखवली.
ब्रेन एन्युरिझम: यात मेंदूतील रक्तवाहिनीच्या कमकुवत भागात फुग्यासारखी सूज आहे. जर हा फुगा फुटला तर मेंदूमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो, जो प्राणघातक ठरू शकतो. सलमानने 2011 मध्ये सांगितले होते की जेव्हा तो ट्रायजेमिनल न्यूराल्जियाच्या उपचारासाठी अमेरिकेला गेला होता तेव्हा त्याला हा आजार झाल्याचे निदान झाले होते.
एव्ही मालफॉर्मेशन : ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये मेंदू किंवा पाठीच्या कण्यातील नसा असामान्य पद्धतीने जोडल्या जातात. यामुळे रक्त प्रवाह आणि ऑक्सिजन पुरवठा विस्कळीत होऊ शकतो.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world