EXCLUSIVE : 'आम्हाला कसलीही भीती नाही, मृत्यू...' CM शिंदेंच्या भेटीनंतर सलीम खान यांची प्रतिक्रिया

Salman Khan House Firing Case: तातडीने कारवाई करत गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळल्या प्रकरणी सलमान खानचे वडील सलीम खान यांनी मुंबई पोलिसांचे कौतुक केले आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Salman Khan House Firing Case: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (CM Eknath Shinde) मंगळवारी (16 एप्रिल 2024) सलमान खानच्या भेटीसाठी त्याच्या वांद्रे येथील घरी दाखल झाले होते. यावेळेस मुख्यमंत्री शिंदे यांनी सलमानचे वडील आणि प्रसिद्ध पटकथा लेखक सलीम खान यांचीही भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सुरक्षेसंदर्भात आश्वासन दिल्याचे माहिती सलीम खान यांनी एनडीटीव्हीशी बातचित करताना दिली. सलीम खान पुढे असेही म्हणाले की, "जर कोणाचे नुकसान झाले असते तर काय झाले असते? याची काही गॅरेंटी नाही. संपूर्ण कुटुंबाला सुरक्षा मिळाली आहे, जी चांगली बाब आहे. आम्हाला कसलीही भीती नाही, मृत्यू निश्चित आहे".

तसेच सुरक्षाव्यवस्था पुरवली जाईल आणि खंडणीसाठी येणारे फोन थांबतील, याची खात्री मुख्यमंत्र्यांनी दिल्याचेही सलीम खान यांनी सांगितले. 

खंडणी मागण्यासाठी कॉल आला होता का? असा प्रश्न विचारल्यानंतर सलीम खान यांनी नाही असे उत्तर दिले. पण पुढे ते असेही म्हणाले की, "साधारणतः अशा गोष्टी खंडणी मागण्यासाठी असतात. ते म्हणू शकतात की ही घटना काळवीटाशी संबंधित आहे, पण त्यांचा हेतू काही वेगळाच आहे."

Advertisement

पोलिसांनी तातडीने केलेल्या कारवाईचे केले कौतुक

या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जलदगतीने कारवाई करत आरोपींना अटक केले, असे म्हणत सलीम खान यांनी पोलिसांचे कौतुक केले. 

...बिश्नोई गँगला धुळीस मिळवू - CM शिंदे

दरम्यान यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पत्रकारांशी संवाद साधताना लॉरेन्स बिश्नोईचा खात्मा करण्यासंदर्भात प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की,"ही मुंबई आहे, महाराष्ट्र आहे. येथे कोणाचीही दादागिरी आम्ही चालू देणार नाही. बिश्नोई गँगला आम्ही संपवून टाकू. येथे कोणतीही गँग आली तरीही त्यांना मातीमध्ये मिळवण्यात पोलीस समर्थ आहेत. सलमानच्या कुटुंबाची सुरक्षा ही आमची जबाबदारी आहेत. त्यांच्या सुरक्षेमध्ये वाढ करण्यासंबंधीच्या सूचना मी पोलीस आयुक्तांना दिल्या आहेत."

Advertisement

सरकार खान कुटुंबासोबत आहे - CM शिंदे 

"सरकार तुमच्यासोबत असल्याचे मी सलमान खानला सांगितले आहे. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. कोणाचीही सुटका केली जाणार नाही. अशा पद्धतीने कोणालाही लक्ष्य केले जाऊ नये", असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले. 

सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर गोळीबार

सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर रविवारी (14 एप्रिल) पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी गोळीबार करून पळ काढला. यावेळेस सलमान खान आपल्या कुटुंबीयांसह घरामध्येच होता. सीसीटीव्हीच्या मदतीने शोधमोहीम सुरू करत पोलिसांनी आरोपींना गुजरातच्या भूज परिसरातून अटक केली. पोलिसांच्या सूत्रांनुसार, आरोपी लॉरेन्स बिश्नोई गँगचे सदस्य आहेत. दरम्यान लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईने गोळीबाराची जबाबदारी स्वीकारली आहे.

Advertisement

आणखी वाचा 

आरोपींनी सलमान खानच्या घराची 3 वेळा केली रेकी : मुंबई पोलीस 

सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्यांच्या मुसक्या पोलिसांनी कुठे व कशा आवळल्या? वाचा सविस्तर

जीवे मारण्याच्या धमकीनंतर सलमान खान पहिल्यांदाच घराबाहेर, बंदोबस्त किती? Watch Video

Topics mentioned in this article