Salman Khan New Post: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानने सोशल मीडियावर नवीन पोस्ट शेअर केली आहे. यावेळेस भल्या पहाटे 26 वर्षे जुन्या सिनेमातील गाण्यासह त्याने एका अशा खास व्यक्तीसोबतचा फोटो शेअर केला आहे, ज्याला त्याने आपला मोठा भाऊ म्हटले आहे. विशेष म्हणजे ती व्यक्ती शाहरुख खान नाही किंवा आमीर खानही नाही; तर ते बॉलिवूडचे सुपरस्टार आहेत, ज्यांनी 80च्या दशकापासून आजपर्यंत बॉलिवूडमध्ये अनेक हिट सिनेमे दिले आहेत. तुम्हाला वाटत असेल की तो व्यक्ती नेमका कोण आहे? तर हा व्यक्ती दुसरातिसरा कोणी नसून 'संजू बाबा' म्हणजेच संजय दत्त आहे, ज्याच्यासोबत सलमान खानने दोन फोटो शेअर केले आहेत आणि त्याला आपला मोठा भाऊ म्हटले आहे.
संजू बाबाला म्हटले मोठा भाऊ
सोशल मीडियावर संजय दत्तला मिठी मारतानाचे दोन फोटो शेअर करत सलमान खानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "बाबा फॉरेव्हर बाबा... आणि बाबा.. बाबा असतो. संजू बाबा आहे आपल्या सर्वांचा बाबा आणि संजू बाबा आता आपल्या मुलांचा बाबा, माझा मोठा भाऊ संजय दत्त, भगवान जीझस सर्व... या माणसाला नेहमी खूश ठेवो, आय लव्ह यू बाबा."
सलमान खानने व्यक्त केल्या भावना
या पोस्टद्वारे सलमान खानने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. वर्ष 2000 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'चल मेरे भाई' सिनेमाचे दिग्दर्शन डेव्हिड धवन यांनी केले होते. यामध्ये करिश्मा कपूरव्यतिरिक्त सलमान खान आणि संजय दत्त मुख्य भूमिकेत होते. हा एक कॉमेडी सिनेमा होता, ज्यामध्ये संजय दत्त आणि सलमान खान भावांच्या भूमिकेत होते.
सलमान खानची संजय दत्तसाठी भावुक पोस्ट
सलमान खानचा आगामी सिनेमा
सलमान खानचा आगामी सिनेमा 'मातृभूमी' सध्या चर्चेत आहे, ज्याच्या रिलीजची चाहते उत्सुकतेने वाट पाहत आहेत. याशिवाय सलमान खानचा बहुप्रतीक्षित रिअॅलिटी शो 'बिग बॉस 20' देखील सुरू होणार आहे, ज्यासाठी चाहते उत्सुक आहेत. पण त्याआधी सलमान खान त्याचा भाऊ सोहेल खानसोबत प्राइम व्हिडीओच्या अलायन्स शोमध्ये दिसणार आहे.