जाहिरात

सलमान खानचा VIDEO व्हायरल, आपल्या हिरोची अवस्था पाहून फॅन्स चिंतीत

Salman Khan Viral Video: सलमान सध्या सिकंदर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एआर मुरुगदॉस हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

सलमान खानचा VIDEO व्हायरल, आपल्या हिरोची अवस्था पाहून फॅन्स चिंतीत

Salman Khan Viral Video:  सलमान खानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सलमान एका इव्हेंटमध्ये सहभागी झाला होता. तिथला हा व्हिडीओ आहे. 'हम साथ साथ है' या सिनेमाच्या रियुनियनचा हा कार्यक्रम होता. याच कार्यक्रमामध्ये सोनाली बेंद्रे आणि सलमान खानची भेट झाली.

सोनाली बेंद्रे आली त्यावेळा सलमान खान सोफ्यावर बसला होता. मात्र सोफ्यावरून उठताना सलमानला त्रास होताना दिसत आहे. या व्हिडीओनंतर सलमानच्या फॅन्सच्या अनेक कमेंट या व्हिडीओवर आल्या आहे.   

व्हिडीओमध्ये दिसत आहे की, सलमान खानला सोफ्यावरुन उठताना त्रास होत आहे. सलमान गुडघ्याला हात लावत उठताना दिसत आहेत. मात्र सलमानला त्रास होत असला तरी त्यांने या कार्यक्रमात डान्स परफॉर्मन्स देखील केला. 

सलमानच्या फॅन्सनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना चिंता व्यक्त केली. एका यूजरने लिहिलं की, "सलमान खानने त्याच्या बरगडीच्या दुखापतीकडे लक्ष द्यावे." आणखी एका यूजरने लिहिलं की, "आरोग्यापेक्षा आणखी काही महत्त्वाचं नाही, सलमान सर." एका यूजरने लिहिलं की, आमच्या लहानपणीच्या हिरोचं वय वाढत आहे आणि आमचं पण. 

सलमान सध्या सिकंदर सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. एआर मुरुगदॉस हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com