जाहिरात

Sameer Wankhede: फिल्मी पात्रात आणि माझ्यात 4 साम्य; समीर वानखेडे यांचे 'रेड चिलीज'ला दिल्ली हायकोर्टात उत्तर

Sameer Wankhede defamation case: Ba***ds of Bollywood' या वेबसीरिजमधून आपली प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत वानखेडे यांनी हा खटला दाखल केला आहे

Sameer Wankhede: फिल्मी पात्रात आणि माझ्यात 4 साम्य; समीर वानखेडे यांचे 'रेड चिलीज'ला दिल्ली हायकोर्टात उत्तर
मुंबई:

जीतेंद्र दीक्षित, एक्झिक्युटिव्ह एडिटर, NDTV नेटवर्क

Sameer Wankhede defamation case:  आर्यन खान ड्रग्स प्रकरणात चर्चेत आलेले आय.आर.एस. अधिकारी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांनी शाहरुख खानच्या 'रेड चिलीज एन्टरटेनमेंट' (Red Chillies Entertainment) कंपनीविरुद्ध दिल्ली हायकोर्टात दाखल केलेल्या मानहानीच्या (Defamation) खटल्यात आपला सविस्तर उत्तर सादर केले आहे. 'Ba***ds of Bollywood' या वेबसीरिजमधून आपली प्रतिमा मलिन केल्याचा आरोप करत वानखेडे यांनी हा खटला दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या शोमधील एनसीबी (NCB) अधिकाऱ्याचे पात्र आणि त्यांच्यात 4 महत्त्वाचे आणि स्पष्ट साम्य असल्याचा दावा त्यांनी कोर्टात केला आहे. राष्ट्रीय आदर्श वाक्य 'सत्यमेव जयते' (Satyamev Jayate) चा उपहास केल्याचा अत्यंत गंभीर आरोपही वानखेडे यांनी केला आहे.

फिल्मी' पात्रात माझ्या 4 स्पष्ट साम्य

समीर वानखेडेसमीर वानखेडे यांनी कोर्टाला दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले आहे की, 'Ba *** of Bollywood' या शोमधील एनसीबी अधिकाऱ्याचे पात्र केवळ काल्पनिक नाही, तर ते थेट त्यांच्या जीवनाशी आणि कामाशी जोडलेले आहे. त्यांनी पात्रातील आणि स्वतःमधील 4 स्पष्ट साम्य कोर्टाच्या निदर्शनास आणले.

1. शारीरिक समानता: या वेबसीरिजमधील पात्राची चेहऱ्याची आणि शरीराची ठेवण वानखेडे यांच्याशी मिळतीजुळती आहे. 

 2. बोलण्याची आणि वागण्याची शैली : या वेबसीरिजमधील पात्राची बोलण्याची पद्धत, काम करण्याची शैली आणि हावभाव हे समीर वानखेडे यांच्यासारखेच आहेत. यामुळे प्रेक्षकांना हे पात्र थेट त्यांच्याशी संबंधित असल्याची जाणीव होते.

3.शोमधील पात्र चित्रपट उद्योगातील एका 'प्रभावशाली' व्यक्तीला अटक करते. वानखेडे यांनी कोर्टात स्पष्ट केले की, ही हाय-प्रोफाइल अटक आणि आर्यन खान प्रकरण: घटना थेट आर्यन खान (Aryan Khan) याच्या अटकेच्या घटनेशी जोडली जाते. त्यामुळे ही समानता अत्यंत स्पष्ट आहे.

4. 'सत्यमेव जयते'चा वारंवार उपहास: सर्वात गंभीर बाब म्हणजे, शोमधील हे पात्र वारंवार "सत्यमेव जयते" (Satyamew Jayate) या राष्ट्रीय आदर्श वाक्याचा उपयोग करते. वानखेडे यांनी सांगितले की, आर्यन खान प्रकरणाच्या तपासणीदरम्यान ते माध्यमांशी बोलताना वारंवार याच शब्दाचा वापर करत असत. राष्ट्रीय आदर्श वाक्याचा अपमानजनक पद्धतीने किंवा उपहासात्मक पद्धतीने वापर करणे कोणत्याही परिस्थितीत क्षम्य नाही, असे मत त्यांनी कोर्टात मांडले.

( नक्की वाचा : Raj Thackeray: निवडणूक आयोगाला राज ठाकरेंचं 'ओपन चॅलेंज'! 'दुबार मतदारां'चा ढिगारा दाखवत केला मोठा गौप्यस्फोट )
 

'काल्पनिक' असण्याचा दावा खोटा

रेड चिलीज एंटरटेनमेंटने हा शो 'पूर्णपणे काल्पनिक' असल्याचा जो दावा केला आहे, तो वानखेडे यांनी पूर्णपणे फेटाळून लावला आहे. त्यांनी कोर्टाला सांगितले की, आर्यन खान याने स्वतः एका मुलाखतीत ही वेब सिरीज "काही अंशी सत्य घटनेवर प्रेरित" असल्याचे मान्य केले होते. 

आर्यन खानचे हे विधान रेड चिलीजचा 'पूर्णपणे काल्पनिक' असल्याचा दावा खोटा ठरवण्यासाठी पुरेसे आहे. बदनामीकारक आशय आणि त्याची भाषा पाहिली, तर या शोमागे कोणतीही कलात्मक कथा सांगण्याचा उद्देश नसून, 'वैयक्तिक आणि संस्थात्मक सूडबुद्धी' तसेच आपली प्रतिष्ठा खराब करण्याचा स्पष्ट हेतू आहे, असा जोरदार युक्तिवाद वानखेडे यांनी केला.

'तो' आरोप फेटाळला

समीर वानखेडे यांनी सांगितले की, या मानहानीकारक प्रसारामुळे केवळ त्यांनाच नव्हे, तर त्यांच्या पत्नीला आणि बहिणीलाही लोकांकडून सातत्याने आक्षेपार्ह आणि घाणेरडे संदेश येत आहेत. 'रेड चिलीज'ने त्यांच्यावर 'पातळ कातडीचा' (Thin-skinned) अधिकारी असल्याचा केलेला आरोप त्यांनी फेटाळून लावला. एक सरकारी अधिकारी सार्वजनिक पदावर कार्यरत असला म्हणून त्याला निराधार बदनामी शांतपणे सहन करावी लागणे अपेक्षित नाही. ही लढाई त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबाच्या मूलभूत संवैधानिक अधिकारांचे रक्षण करण्यासाठी आहे, असे त्यांनी कोर्टात स्पष्ट केले.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com