Salman Khan Aishwarya Rai: बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भन्साली भव्यदिव्य आणि ब्लॉकबस्टर सिनेमांसाठी ओळखले जातात. संजय लीला भन्साली यांच्या 'पद्मावत' या ब्लॉकबस्टर सिनेमाला रिलीज होऊन सात वर्षे पूर्ण झाली आहेत. 'पद्मावत' सिनेमामध्ये रणवीर सिंह, शाहिद कपूर, दीपिका पादुकोण आणि अदिती राव हैदरी यांच्या प्रमुख भूमिका होत्या. पण खरंतर या सिनेमाची कहाणी सलमान खान आणि त्याची एक्स गर्लफ्रेंड ऐश्वर्या रायकरिता लिहिण्यात आली होती. तसंच सिनेमातील खिलजीच्या भूमिकेत शाहरुख खान झळकणार होता. संजय लीला भन्सालींच्या या महत्त्वपूर्ण प्रोजेक्टमध्ये सलमान-ऐश्वर्या एकत्र काम का करू शकले नाहीत? जाणून घेऊया सविस्तर माहिती...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
'पद्मावत'साठी सलमान-अॅश होते पहिली निवड
'हम दिल दे चुके सनम' सारखा सुपरहिट सिनेमा दिल्यानंतर संजय लीला भन्साली यांनी 'पद्मावत' सिनेमावर काम करण्यास सुरुवात केली होती. तुम्हाला ऐकून आश्चर्याचा धक्का बसेल की 'बाजीराव मस्तानी' सिनेमासाठीही भन्सालींची पहिली निवड सलमान-ऐश्वर्या हीच जोडी होती. पण काही कारणास्तव दोघांचे ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर दोघांनाही एकत्र काम करण्याची इच्छा नव्हती. दुसरीकडे भन्सालींनी वर्ष 2015मध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोण या जोडीसह 'बाजीराव मस्तानी' सिनेमा केला, जो बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरला. वर्ष 2018मध्ये 'पद्मावत' सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकला, तोही ब्लॉकबस्टर ठरला.
(नक्की वाचा: सलमान खानच्या घराला सुरक्षाकवच, बुलेटप्रूफ काचांसह लावले विद्युत कुंपण)
ऐश्वर्या रायने ठेवली होती 'ही' अट
ऐश्वर्याने 'पद्मावत' सिनेमामध्ये काम करण्यासाठी संजय लीला भन्सालींसमोर एक जगावेगळी अट ठेवली. सिनेमामध्ये सलमान खानला अलाउद्दीन खिलजी ही खलनायकाची भूमिका द्यावी आणि दोघांचा एकत्र एकही सीन नसावा, तरच सिनेमामध्ये काम करेन; अशी अट ऐश्वर्याने भन्सालींसमोर ठेवली होती. दुसरीकडे सलमान खानला ऐश्वर्यासोबत काम करण्यास काहीही अडचण नव्हती, पण तिच्या या अटीवर त्याला काम करायचे नव्हते.
(नक्की वाचा: सलमान खानच्या सेटवर गोंधळ घालणाऱ्या संशयित ज्युनिअर आर्टिस्टला अटक)
मग भन्सालींना काढला हा तोडगा
'हम दिल दे चुके सनम' सिनेमाप्रमाणेच 'पद्मावत' सिनेमामध्येही त्यांची प्रेमकहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळावी, अशी सलमानची इच्छा होती. पण कोणताही तोडगा न निघाल्याने अखेर संजय लीला भन्साली यांनी रणवीर-दीपिका आणि शाहिद कपूरची सिनेमासाठी निवड केली. सिनेमामध्ये रणवीर सिंहने अलाउद्दीन खिलजीची भूमिका साकारली होती.