जाहिरात

Sherlyn Chopra: 'नकोय तो भार!' शर्लिन चोप्राने Breast Implants काढले; अभिनेत्रीने सांगितली वेदनेची कहाणी

Sherlyn Chopra Breast Implants: अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक मोठा निर्णय घेतला आहे. तिनं काही वर्षांपूर्वी त जे ब्रेस्ट इम्प्लांट्स लावून घेतले होते, ते आता  पूर्णपणे काढून टाकले आहेत.

Sherlyn Chopra:  'नकोय तो भार!' शर्लिन चोप्राने Breast Implants काढले; अभिनेत्रीने सांगितली वेदनेची कहाणी
Sherlyn Chopra Breast Implants : शर्लिननं सांगितलं की, गेल्या अनेक दिवसांपासून तिला शरीराच्या विविध भागांमध्ये असह्य वेदना जाणवत होत्या.
मुंबई:

Sherlyn Chopra Breast Implants: अभिनेत्री शर्लिन चोप्रानं एक मोठा निर्णय घेतला आहे. तिनं काही वर्षांपूर्वी त जे ब्रेस्ट इम्प्लांट्स लावून घेतले होते, ते आता  पूर्णपणे काढून टाकले आहेत. या निर्णयामागील कारण आणि त्यांचा संपूर्ण अनुभव त्यांनी नुकताच सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांसोबत शेअर केला. या संपूर्ण घटनेमुळे तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला असला तरी, तिच्या या धाडसी निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

का घेतला निर्णय?

शर्लिन चोप्राने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करत तिच्या आरोग्याबद्दल माहिती दिली. तिने सांगितले की, गेल्या अनेक दिवसांपासून तिला शरीराच्या विविध भागांमध्ये असह्य वेदना जाणवत होत्या. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना हे समजले की या वेदनांचे मूळ कारण त्यांच्या शरीरात बसवलेले ब्रेस्ट इम्प्लांट्स आहेत. इम्प्लांट्समुळे होणारा त्रास आणि आरोग्याच्या समस्या लक्षात घेऊन, शर्लिननं त्वरित हे इम्प्लांट्स काढण्याचा कठोर निर्णय घेतला.

शार्लिननं यापूर्वी ऑगस्ट 2023 मध्येही तिच्या चेहऱ्यावरील सर्व फिलर्स (Fillers) काढून टाकले होते, जेणेकरून त्या आपल्या मूळ आणि नैसर्गिक रूपात दिसू शकतील. या दोन्ही निर्णयांवरून शर्लिन चोप्रा नैसर्गिक सौंदर्याला प्राधान्य देत असल्याचे स्पष्ट होते.

( नक्की वाचा : VIDEO : 'नीली साडी' ट्रेंडवर गिरीजा ओकचं कळकळीचं आवाहन, म्हणाली, 'माझ्या 12 वर्षांच्या मुलाचा विचार करा...' )
 

सर्जरीपूर्वीची भावना

ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरीपूर्वी (Breast Implant Removal Surgery) शर्लिननं तिच्या भावना व्यक्त केल्या. होत्या "मी थोडी घाबरली आहे का? हो, थोडीशी. पण उत्साहित खूप आहे. कोणत्याही ओझ्याशिवाय एक अगदी नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी मी आतुर आहे. आज माझी ब्रेस्ट इम्प्लांट रिमूव्हल सर्जरी करणाऱ्या डॉक्टरांना आणि मला देवाने आशीर्वाद द्यावा अशी मी प्रार्थना करते. " 

'हलकं' झाल्याची भावना
यशस्वी शस्त्रक्रियेनंतर, शर्लिन चोप्रा यांनी पुन्हा एक पोस्ट शेअर केली आणि चाहत्यांना आपल्यासाठी प्रार्थना करण्याची विनंती केली. शस्त्रक्रियेनंतर त्यांना 'हलकं (Lighter) वाटत आहे', असे त्यांनी कॅप्शनमध्ये स्पष्ट केले.

शर्लिननं स्पष्ट केलं की, तिची ही पोस्ट फिलर्स किंवा सिलिकॉन इम्प्लांट्सची किंवा ते वापरणाऱ्यांची टीका करण्यासाठी नाही.  तर मी स्वतःला आहे तसे स्वीकारले आहे, हा निर्णय दर्शवण्यासाठी आहे.

'हेवी ब्रेस्ट इम्प्लांट' म्हणजे काय?

हेवी ब्रेस्ट इम्प्लांट (Heavy Breast Implant) ही एक शस्त्रक्रिया प्रक्रिया आहे, ज्यामध्ये स्तनांचा आकार, बनावट किंवा स्थिती बदलण्यासाठी शरीरात सिलिकॉन (Silicone) किंवा सलाइन (Saline) ने भरलेले कृत्रिम इम्प्लांट्स लावले जातात. जेव्हा हे इम्प्लांट्स खूप मोठे किंवा वजनदार असतात, तेव्हा त्यांना 'हेवी ब्रेस्ट इम्प्लांट' म्हटले जाते. सामान्यतः, सिलिकॉन आणि सलाइन ब्रेस्ट इम्प्लांट्सचा वापर 10 ते 15 वर्षांपर्यंत करता येतो. यानंतर वैद्यकीय सल्ल्यानुसार ते बदलणे किंवा काढणे आवश्यक असते.


स्पष्टीकरण : ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. हा कोणत्याही योग्य उपायाला पर्याय नाही. अधिक माहितीसाठी नेहमीच एखादा तज्ज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. NDTV नेटवर्क या विषयावर अधिक माहितीसाठी जबाबदारीचा दावा करत नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com