Virat Kohli Catch Video Viral : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यात आज, रविवार, 19 ऑक्टोबर रोजी पर्थ येथे सुरू असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (ODI Match) भारतीय संघाची सुरुवात अत्यंत निराशाजनक झाली आहे. सामन्याच्या सुरुवातीच्या 10 षटकांच्या आतच भारताचे एकापाठोपाठ 3 विकेट्स पडले, ज्यामुळे टीम इंडियाला मोठ्या अडचणीच आली. कर्णधार रोहित शर्मा आणि स्टार फलंदाज विराट कोहली या दोघांचाही फ्लॉप शो (Flop Show) झाल्यामुळे सोशल मीडियावर मीम्सचा (Memes) अक्षरशः पाऊस पडत आहे. मिचेल स्टार्कच्या गोलंदाजीवर विराटने बॅकवर्ड प्वाईंटवर शॉट मारला, पण कूपर कोनोलीने हवेत उडी मारून विराटचा अप्रतिम झेल घेतला. कूपरने घेतलेलेल्या विराटच्या जबरदस्त झेलचा व्हिडीओ एक्सवर प्रचंड व्हायरल झाला आहे. भारताने 29 षटकांत 9 विकेट्स गमावून 136 धावांपर्यंत मजल मारली. त्यामुळे ऑस्ट्रेलियापुढे विजयासाठी 137 धावांचं आव्हान असणार आहे.
जवळपास 223 दिवसांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये (International Cricket) पुनरागमन करणाऱ्या विराट कोहलीकडून भारतीय चाहत्यांना मोठ्या खेळीची अपेक्षा होती. मात्र, केवळ 8 चेंडूंचा सामना करून विराट कोहली शून्यावर (Duck) बाद झाला आणि ही अपेक्षा फोल ठरली. कोणत्याही मॅच प्रॅक्टिसशिवाय मैदानावर उतरलेल्या कोहलीच्या कामगिरीबद्दल आधीच शंका व्यक्त केली जात होती.
विराट कोहली ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिल्यांदाच शून्यावर बाद झाला
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या वन-डे सामन्यात विराट कोहली 8 चेंडूंमध्ये शून्यावर बाद झाला आणि तो मिचेल स्टार्कचा (Mitchell Starc) शिकार बनला. विशेष म्हणजे, ऑस्ट्रेलियातील वन-डे सामन्यात शून्यावर बाद होण्याची विराट कोहलीची ही पहिलीच वेळ आहे. मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कोहलीला 8 व्यांदा बाद केले आहे, ज्यात वन-डे मध्ये दोनदा बाद केले आहे.
नक्की वाचा >> Viral Photo : थांबा जरा..तुम्हीही GPS चा वापर करून वाहन चालवताय? Google मॅपने चालकाला दाखवला सर्वात खतरनाक रस्ता
इथे पाहा विराट कोहलीच्या झेलचा व्हिडीओ
VIRAT KOHLI GONE FOR A DUCK!#AUSvIND pic.twitter.com/cg9GbcMRAE
— cricket.com.au (@cricketcomau) October 19, 2025
भारताचा स्टार खेळाडू आणि माजी कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आज ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या या पहिल्या वन-डे सामन्यात आपला 500 वा आंतरराष्ट्रीय सामना (500th International Match) खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. यासह तो भारतासाठी ५०० आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा पाचवा खेळाडू बनला आहे. मात्र, या महत्त्वपूर्ण सामन्यात तो केवळ ८ धावा काढून आपली विकेट गमावून बसला.रोहित शर्मासाठी ही ऑस्ट्रेलियाविरुद्धची वन-डे मालिका अत्यंत खास आहे, कारण याच मालिकेवर त्याच्या 2027 च्या वन-डे विश्वचषक (ODI World Cup) खेळण्याच्या आशा टीकून आहेत.
नक्की वाचा >> Funny Video : 'अभ्यास केला नाही तर काय होईल?', चिमुकलीनं उत्तर देताच शाळेतील मॅडम कोमात अन् विद्यार्थी जोमात
मात्र, 3 सामन्यांच्या या मालिकेतील पहिल्याच सामन्यात तो अपयशी ठरला आहे. त्यामुळे, आता उर्वरित दोन वन-डे सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करण्यासाठी त्याच्यावर मोठा दबाव (Pressure) असेल. विराटने यापूर्वीही दबावामध्ये चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि ऑस्ट्रेलियातील त्याचे रेकॉर्ड चांगले आहेत. भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या वनडे सामन्यात पावसाने चांगलाच खोडा घातल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु झाल्यापासून पावसामुळे चार वेळा खेळ थांबवावा लागला.पण त्यानंतर हा सामना प्रत्येकी 26 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world