
बॉलिवूड अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) आणि सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आई-बाबा झाले आहेत. नुकतीच कियारा कुटुंबासह रुग्णालयात गेल्याचं समोर आलं होतं. आता कियारा अडवाणीने एका गोंडस मुलीला जन्म दिल्याचं सांगितलं जात आहे. अद्याप दाम्पत्याने कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही. मात्र या बातमीने चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलं आहे.
कियारा अडवाणीने तब्बल तीन वर्षांपर्यंत सिद्धार्थ मल्होत्राला डेट केल्यानंतर 2023 मध्ये राजस्थानमध्ये लग्न केलं. त्यानंतर कियाराने 28 फेब्रुवारी 2025 मध्ये आपल्या प्रेग्नेन्सीची गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती. त्यावेळी त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. ज्यामध्ये कियारा-सिद्धार्थ आपल्या हातात पांढऱ्या रंगाचे बाळाचे मोजे पकडून होता. त्यांनी कॅप्शनमध्ये बाळाच्या इमोजीसह लिहिलं होतं, आमच्या जीवनातील सर्वात मोठं गिफ्ट...लवकरच येतंय.
दरम्यान अद्याप तरी त्यांनी सोशल मीडियावर कोणतीही पोस्ट केलेली नाही. लवकरच ते ही गुड न्यूज त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर करतील अशी अपेक्षा आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world