क्रिकेट आणि हिंदू राष्ट्राच्या खुळखुळ्यांनी...वर्ल्ड कप विजयाच्या सेलिब्रेशनवर गायिकेचा संताप

Neha Singh Rathore : गायिका नेहा सिंह राठोडनं भारतीय क्रिकेट टीमच्या फॅन्सवर जोरदार टीका केली आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
Neha Singh Rathore
मुंबई:

Neha Singh Rathore : भारतीय क्रिकेट टीमनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी20 वर्ल्ड कप (T20 World Cup 2024) स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं. वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या या स्पर्धेत भारतीय टीमनं एकही सामना न गमावता विजेतेपद पटकालं. हा देखील एक रेकॉर्ड आहे. टीम इंडियानं फायनलमध्येही जोरदार कमबॅक करत आफ्रिकेचा 7 रननं पराभव केला. भारतीय टीमनं तब्बल 17 वर्षांनंतर टी20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे.

टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देशात आनंदाचं वातावरण आहे. या विजयानं क्रिकेट फॅन्स भावुक झाले आहेत. त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांचा आनंद साजरा केला. क्रिकेट फारसं न पाहाणारे भारतीय देखील या आनंदात सहभागी झाले आहेत. पण, भोजपुरी गायिका नेहा सिंह राठोडला हे सेलिब्रेशन आवडलं नाही. नेहानं टीम इंडियाच्या विजेतेपदाचं सेलिब्रेशन करणारे बेरोजगार असल्याची टीका केली आहे. नेहानं तिच्या X हँडलवरुन तशी पोस्ट केली आहे.

( Hardik Pandya : व्हिलन ते हिरो! सारं काही विरोधात असताना हार्दिकनं कसा जिंकून दिला भारताला वर्ल्ड कप? )
 

काय म्हणाली नेहा?

'32 व्या वर्षी वडिलांच्या पैशांनी मोबाईलमध्ये नेट पॅक टाकून क्रिकेटला आपला धर्म सांगणारे बेरोजगार... तुम्ही फक्त दयेला पात्र आहात. क्रिकेट आणि हिंदू राष्ट्राच्या खुळखुळ्यांनी कधीपर्यंत स्वत:चं मन रमवाल? तुमच्यासारखे लाखो तरुण बेरोजागर असेपर्यंत देश जिंकणार नाही. ब्रिटीश राजवट आणि त्यांच्या गुलाम देशातील या खेळात देशभक्ती शोधणाऱ्या माझ्या भावांनो, तुम्ही हॉकीचा पूर्ण सामना शेवटी कधी पाहिला होता? ' अशी पोस्ट नेहानं केली आहे.

नेहाची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे. या पोस्टबद्दल तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात येतंय.