जाहिरात

Smriti-Palash News: स्मृती-पलाश पुन्हा एकत्र येणार? एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Smriti-Palash Patch-up? : भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुछाल यांच्या ब्रेकअपला एक वर्ष पूर्ण होत असतानाच, सोशल मीडियावर एका व्हिडिओने खळबळ उडवून दिली आहे.

Smriti-Palash News: स्मृती-पलाश पुन्हा एकत्र येणार? एका व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

Smriti Mandhana and Palash Muchhal: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार स्मृती मंधाना आणि संगीतकार पलाश मुछाल यांच्या ब्रेकअपला एक वर्ष पूर्ण होत आहे. एकमेकांपासून दुरावलेले स्मृती आणि पलाश पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मुंबईतील एका रेस्टॉरंटबाहेरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे कपल पुन्हा एकत्र येणार का, अशा चर्चांना सुरुवात झाली आहे. 

पलक मुछालने घेतले स्मृतीच्या वडिलांचे आशीर्वाद

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये स्मृती मंधानाचे वडील श्रीनिवास मंधाना एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. याचवेळी तिथे गायक मिथुन आणि त्याची पत्नी पलक मुछाल (पलाशची बहीण) देखील होते. पलक स्मृतीच्या वडिलांच्या पाया पडताना दिसली. श्रीनिवास मंधाना यांनीही हसतमुखाने तिला आशीर्वाद दिले. हा व्हिडिओ समोर आल्यावर दोघांचे कुटुंब पुन्हा जुने हेवेदावे विसरून एकत्र येणार का? असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना आहे. 

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  US-Iran War : इराणची नवी खेळी! होर्मुजमधून जहाज वाहतूक सुरू होणार, मात्र भारतासह अनेक देशांना फटका बसणार)

गेल्या वर्षी नेमकं काय घडलं होतं? 

स्मृती आणि पलाश यांच्या लग्नाची तारीख 23 नोव्हेंबर 2025 ठरली होती. मात्र, लग्नाच्या अवघ्या एक दिवस आधी हे नातं तुटलं. सुरुवातीला स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्याने लग्न पुढे ढकलल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर स्मृतीच्या मैत्रिणींनी पलाशला दुसऱ्या एका महिलेसोबत पाहिल्याचे आणि त्याने फसवणूक केल्याचे आरोप सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पलाशने हे आरोप फेटाळून लावले असले तरी, दोघांनीही अधिकृतपणे सोशल मीडिया पोस्टद्वारे वेगळे होत असल्याची घोषणा केली होती.

(नक्की वाचा- Iran-US War: पायलटला वाचवण्यासाठी महाभारतातील रणनीती आली कामी; शत्रूच्या घरात घुसून अमेरिकेचा 'माईंड गेम')

जुना व्हिडीओ व्हायरल? 

मात्र नवीन व्हिडिओ समोर आल्यानंतर चाहते दोन गटांत विभागले गेले आहेत. काही युजर्सच्या मते हा व्हिडिओ जुना असून केवळ अफवा पसरवण्यासाठी आता व्हायरल केला जात आहे. मात्र, अनेक चाहत्यांना वाटते की स्मृती आणि पलाशने भूतकाळ विसरून नव्या सुरुवातीचा निर्णय घेतला आहे आणि कुटुंबांनी त्याला संमती दिली आहे.

या व्हायरल व्हिडिओवर स्मृती मंधाना किंवा मुछाल कुटुंबाकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com