जाहिरात

Viral Video: चुकीचा स्पर्श केला.. रीलस्टार मानसीने तरुणाच्या थेट थोबाडीत मारली, पाहा VIDEO

InFluencer Mansi Survase Viral Video: प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. दुसरीकडे काही जण हा सर्व प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट केल्याचेही म्हटले आहे.

Viral Video: चुकीचा स्पर्श केला.. रीलस्टार मानसीने तरुणाच्या थेट थोबाडीत मारली, पाहा VIDEO

Reelstar Mansi Suravase Viral Video: गेल्या काही दिवसांपासून महिलांवरील अत्याचाराच्या, छेडछाडीच्या घटना वारंवार घडत आहेत. बसमध्ये, रेल्वे प्रवासादरम्यान तसेच सार्वजनिक ठिकाणीही महिलांच्या विनयभंगाचे प्रकार घडत आहेत, ज्यामुळे महिला सुरक्षेवरुन प्रश्न उपस्थित होत आहे. अशातच एका मराठमोळ्या इन्फ्लूएन्सरसोबत एक धक्कादायक प्रकार घडला असून त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे.

नेमकं काय घडलं?

मानसी सुरवसे ही कोल्हापूरची प्रसिद्ध रीलस्टार तसेच सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे. तिचे इन्स्टाग्रामवर जवळपास 10 लाख फॉलॉअर्स असून सोशल मीडियावर ती प्रचंड लोकप्रिय आहे. तिचे व्हिडिओ, रील्स तुफान व्हायरल होत असतात. सध्या मानसीने शेअर केलेल्या एका धक्कादायक व्हिडिओने सर्वांचे लक्ष वेधले आहे.

या व्हिडिओमध्ये एका तरुणाने तिला चुकीचा स्पर्श केला ज्यानंतर या इन्फ्लूएन्सरने तिथेच त्याच्या थोबाडीत मारली. एवढ्यावर न थांबता तिने त्या मुलाच्या घरी जाऊनही कुटुंबियांसमोर सज्जड दम दिला. हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून नेटकऱ्यांनी त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्यात. दुसरीकडे काही जण हा सर्व प्रसिद्धीसाठी केलेला स्टंट केल्याचेही म्हटले आहे.

व्हिडिओमध्ये काय?

या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, मानसी सुरवसे तिच्या इमारतीच्या पायऱ्यांवर व्हिडिओ शूट करत आहे. ती व्हिडिओ काढत असतानाच एक मुलगा येतो अन् तिला चुकीचा स्पर्श करतो. त्यानंतर ती तात्काळ त्याला जाब विचारते आणि तिथेच त्याच्या कानाखालीही लगावते. हा सगळा प्रकार तिच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. 

दरम्यान, या संपूर्ण घटनेबाबत तिने कॅप्शनमध्येही माहिती दिली आहे. इमारतीच्या पायऱ्यांवर व्हिडिओ शूट करत असताना एक मुलगा अचानक तिथे आला आणि तिच्या शरीराला स्पर्श करत पुढे निघून गेला. तिने त्याला थांबवून त्याच्या कृत्याबद्दल जाब विचारला, पण त्याने कोणतेही उत्तर दिले नाही. त्यानंतर तिने त्याच्या घरी जाऊन तक्रार केल्याचेही सांगितले. तसेच तिच्या कुटुंबियांनी तो मानसिक रुग्ण असल्याचा दावा केल्याचे म्हणत या संपूर्ण प्रकरणावर तिने जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे.  

दरम्यान,