Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding Post: सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल यांनी कोर्ट मॅरेज केले आहे. त्यानंतर दोघांनीही इंस्टाग्रामवर एक सुंदर पोस्ट शेअर करून त्यांच्या लग्नाची घोषणा केली आहे. या खास दिवसाचा सुंदर फोटोही त्यांनी शेअर केला. सोशल मीडियावर हा फोटो वेगाने व्हायरल होत आहे. चाहते आणि सेलिब्रिटी यावर भरभरुन कमेंट्स करत आहेत.
(नक्की वाचा- सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर धर्म बदलणार? होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर)
अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने इन्स्टाग्रामवर पती झहीर इकबालसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात पहिल्या फोटोमध्ये झहीर इकबाल सोनाक्षीच्या हाताचे चुंबन घेताना दिसत आहे. दुसऱ्या फोटोमध्ये झहीर लग्नाच्या कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे. सोनाक्षी तिचे वडील शत्रुघ्न सिन्हा यांचा हात धरून हसताना दिसत आहे. तिसऱ्या फोटोमध्ये दोघेही रोमँटिक पोज देताना दिसत आहे. सोनाक्षीने तिच्या लग्नासाठी एक सुंदर क्रीम रंगाची साडी निवडली आहे. तर साध्या दागिन्यांसह केसांमध्ये पांढरे फूल आहे. तर झहीर पांढऱ्या रंगाच्या कुर्ता पायजमामध्ये दिसत आहे.
(नक्की वाचा- अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का)
या पोस्टसोबत कॅप्शनमध्ये सोनाक्षीने लिहिलं की, सात वर्षांपूर्वी (23-06-2017) या दिवशी आम्ही एकमेकांच्या डोळ्यात प्रेम पाहिले आणि ते कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. आज त्या प्रेमाने आम्हाला सर्व आव्हाने आणि विजयांमध्ये मार्गदर्शन केले आहे आणि आम्हाला या क्षणापर्यंत आणले आहे. जिथे आमच्या दोन्ही कुटुंबांच्या आणि आमच्या दोन्ही देवांच्या आशीर्वादाने आता आम्ही पती-पत्नी आहोत. येथे प्रेम, आशा आणि सर्व सुंदर गोष्टी एकमेकांसोबत आहेत. आतापासून ते कायमचे. सोनाक्षी- झहीर 23.06.2024.