जाहिरात

सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर धर्म बदलणार? होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर

Sonakshi Sinha Zaheer Iqbal Wedding सोनाक्षी सिन्हा लग्नानंतर मुस्लीम धर्म स्विकारणार, अशी चर्चा सुरु आहे. 

सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर  धर्म बदलणार? होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर
Sonakshi Sinha Zaheer Iqbal
मुंबई:

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा 23 जून रोजी लग्न करणार आहे. सोनाक्षी तिचा बॉयफ्रेंड झहीर इक्बालसोबत लग्न करतीय. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड, सोशल मीडिया तसंच सोनाक्षीच्या फॅन्समध्ये या लग्नाची चर्चा सुरु आहे. सोनाक्षीचे वडील आणि शत्रूघ्न सिन्हा यांनीही नुकतंच या लग्नाबाबत आपण नाराज नसल्याचं जाहीर केलंय. मी सोनाक्षीच्या प्रत्येक आनंदात सहभागी होत असल्याचं त्यांनी जाहीर केलंय. त्यातच लग्नानंतर सोनाक्षी मुस्लीम धर्म स्विकारणार, अशी चर्चा सुरु होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

सोनाक्षीचे होणारे सासरे इक्बाल रतनसी यांनी याबाबत महत्त्वाचा खुलासा केला आहे. झहीर इक्बालच्या वडिलांनी 'फ्री प्रेस जर्नल' ला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलं की, 'हे लग्न हिंदू पद्धतीनं होणार नाही. तसंच मुस्लीम पद्धतीनंही होणार नाही. हे एक सिव्हिल मॅरेज असेल. सोनाक्षी तिचा धर्म बदलणार नाही, हे नक्की आहे. दोन मनं जुळणं आवश्यक असतं. धर्माचा यामध्ये काहीही संबंध नाही.' त्याचबरोबर सोनाक्षीच्या होणाऱ्या सासऱ्यांनी या जोडप्याला आशीर्वाद देखील दिला आहे. 

ट्रेंडीग बातमी - अभिषेक बच्चननं मुंबईत खरेदी केले 6 फ्लॅट, किंमत वाचून बसेल धक्का
 

शत्रूघ्न सिन्हा आणि पूनम सिन्हा यांनी देखील सोनाक्षी तिचा धर्म बदलणार नाही, असं त्यांचे व्याही इक्बाल रतनसी यांना सांगितलं आहे. दोन्ही कुटुंबात सर्व काही ठीक असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

मेहंदी कार्यक्रमातील सोनाक्षी आणि झहीरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या जोडप्याचे मित्र तसंच पाहुण्यांनी हे फोटे शेअर केले आहेत. सोनाक्षीनं या कार्यक्रमासाठी लाल आणि पिवळ्या रंगाचा ड्रेस घातला होता. तर झहीरनं प्रिंटेड लाल कुर्ता आणि पांढरा पायजमा घातला होता. मेहंदी कार्यक्रमाच्या लोकेशनला फुलांनी सजवण्यात आलं होतं. आता सर्वांना रविवारी होणाऱ्या या दोघांच्या लग्नाची प्रतीक्षा आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
Bigg Boss OTT 3 : कलाकार ते यूट्यूबर्स सर्व 13 स्पर्धक ठरले, पाहा संपूर्ण यादी
सोनाक्षी सिन्हा झहीर इक्बालशी लग्न केल्यानंतर  धर्म बदलणार? होणाऱ्या सासऱ्यांनी दिलं उत्तर
sonakshi sinha zaheer iqbal officially married announced  share special post on social media instagram
Next Article
सोनाक्षी सिन्हा-जहीर इकबाल अडकले लग्नबंधनात, सोशल मीडियावर शेअर केला पहिला फोटो