- सूर्यवंशम सिनेमातील आनंद वर्धनने तीन वर्षांचा असताना अभिनय क्षेत्रात पाऊल टाकले होते
- आनंद वर्धनने बालकलाकार म्हणून सुमारे 25 सिनेमांमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली
- उत्कृष्ट अभिनयासाठी आनंद वर्धनला नंदी अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट मिळाला आहे
Sooryavansham Movie: सूर्यवंशम सिनेमाची कथा आणि त्यातील पात्रांमुळे तुम्ही हा सिनेमा इच्छा असतानाही विसरू शकत नाही. विशेषतः तो छोटा मुलगा, ज्याने आपल्या निरागसतेने सर्वांची मने जिंकली होती. या पात्राची निरागसता संपूर्ण सिनेमावर भारी पडली. सिनेमातील सोनू आता आता बराच मोठा झाला असून त्याने वयाची तिशी ओलांडली आहे.
3 वर्षांचा असताना अभिनय क्षेत्रात टाकलं होतं पाऊल
'सूर्यवंशम'मध्ये ठाकूर भानुप्रताप सिंह यांचा नातू आणि हिरा सिंह यांच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या त्या मुलाचे नाव आनंद वर्धन आहे. खूप कमी लोकांना माहिती असेल की, आनंद वर्धनने अतिशय लहान वयात सिनेमांमध्ये काम करायला सुरुवात केली होती. केवळ तीन वर्षांचा असताना त्यानं अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं असे म्हणतात. बालकलाकार म्हणून त्याने सुमारे 25 सिनेमांमध्ये काम केले आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. उत्कृष्ट अभिनयासाठी त्याला 'नंदी अवॉर्ड फॉर बेस्ट चाइल्ड आर्टिस्ट'ने देखील सन्मानित करण्यात आले आहे.
(नक्की वाचा: Bhumi Pednekar Paithani Saree: कपाळी चंद्रकोर अन् नाकात नथ! भूमी पेडणेकरच्या पैठणी लुकने चाहत्यांना घातली भुरळ)
(नक्की वाचा: Taapsee Pannu: लग्नानंतर अभिनेत्रींसोबत इंडस्ट्रीत काय घडतं? तापसी पन्नूने बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव केलं उघड)
सिनेसृष्टीत 33व्या वर्षी कमबॅक
काळाबरोबर आनंद वर्धन सिनेमांपासून थोडा दूर गेला आणि त्याने आपल्या शिक्षणाकडे लक्ष दिले. पण शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने पुन्हा एकदा सिनेसृष्टीकडे वळण्याचा निर्णय घेतला आहे. आनंद वर्धन आता 35 वर्षांचा झाला असून सोशल मीडियावर तो खूप सक्रिय असतो. तो वारंवार आपले नवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतो, ज्यावर चाहते भरभरून प्रेम करतात. गेल्या वर्षी तो 'निंदुरिंचू जहापना' या सिनेमात मुख्य भूमिकेत झळकला होता. रोमँटिक भूमिकेतही प्रेक्षकांनी त्याला पसंती दर्शवली आहे.