Bhumi Pednekar Paithani Saree: बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरची (Bhumi Pednekar) सध्या सोशल मीडियावर तुफान चर्चा सुरू आहे. भूमीने मराठमोळ्या लुकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन संस्कृतीचा वारसा जपत अस्सल 'मराठी मुलगी' लुक तिने कॅरी केलाय, ज्याची सर्वत्र चर्चा होतेय. भूमीने फुलांची नक्षीकाम असलेली अबोली रंगाची क्लासिक पैठणी नेसली आहे, यावर तिने गुलाबी रंगाचे ब्लाउज घातले आहे. ब्लाउजवर अतिशय आकर्षक स्वरुपाचे नक्षीकाम आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. 'पंकज एस हेरिटेज'च्या कलेक्शनमधील ब्लाउजवर सोन्याच्या जरीचे नक्षीकाम आणि मौल्यवान खड्यांचे वर्क करण्यात आले आहे.
सोन्याची हसली आणि हेरिटेज दागिने | Bhumi Pednekar Paithani Saree Look
केवळ साडीच नव्हे तर भूमीने तितकेच खास दागिनेही घातले आहेत. पूजा निगमने डिझाइन केलेली 22 कॅरेट सोन्याची हसली तिने (एक प्रकारचा गळ्यातील दागिना) घातली आहे, ज्यावर हिरे आणि माणिक आपण पाहू शकता. यासोबत तिने सोन्याच्या मण्यांची माळही घातली होती. झुमके, नथ, बुगडी, बांगड्या आणि केसांमधील दागिने यामुळे भूमीचा लुक प्रचंड सुंदर दिसतोय. या सर्वांमध्ये सर्वात जास्त लक्ष वेधून घेतले ते म्हणजे तिच्या कपाळावरील धातूच्या चंद्रकोर टिकलीने. ही टिकली सुरमयी ब्रँडची आहे.
(नक्की वाचा: Taapsee Pannu: लग्नानंतर अभिनेत्रींसोबत इंडस्ट्रीत काय घडतं? तापसी पन्नूने बॉलिवूडचं धक्कादायक वास्तव केलं उघड)
भूमी पेडणेकरचे सुंदर फोटो | Bhumi Pednekar Paithani Saree Photos
(नक्की वाचा: Monalisa News: फरमानशी लग्न केल्यानंतर मोनालिसाच्या आयुष्यात वादळ, सासरे म्हणाले: घरात पाऊलही ठेवू देणार नाही)
हेअर आणि मेकअप | Bhumi Pednekar Paithani Saree Marathi Look
नॅचरल लुक मेकअपमुळे भूमी सुंदर दिसतेय. मेकअपसाठी सोनिक सरवटेने पिंक-टोन ब्लश आणि लिपस्टिकची निवड केली होती. डोळ्यांच्या मेकअपसाठी शिमरचा वापर करण्यात आला आहे. ज्योती मांजरेने भूमीची हेअरस्टाइल अप्रतिम केली होती. तुम्ही देखील भूमीचा हा लुक फॉलो करू शकता.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world