
हिंदी सिनेमा प्रमाणेच दक्षिणात्य चित्रपटांचेही जगभरात फॅन्स आहेत. नाविन्यपूर्ण प्रयोग, सशक्त कथा आणि दमदार संगीत या जोरावर भाषेचा अडथळा पार करत हे सिनेमे जगभर यशस्वी ठरले आहेत. या सिमेमातील प्रमुख कलाकारांना फॉलो करणारा प्रेक्षक हा फक्त त्यांच्या राज्यात नाही, तर संपूर्ण जगात आहे. साऊथ इंडियन इंडस्ट्रीमधील प्रमुख अभिनेत्यांमध्ये विजय देवरकोंडाचा समावेश आहे. विजयनं नुकताच त्याचा वाढदिवस साजरा केला.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
विजय देवरकोंडानं नुव्विला (2001) या चित्रपटातून फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केलं. त्यानं एका मुलाखतीमध्ये सुरुवातीच्या दिवसातील संघर्षाचं वर्णन केलं आहे. अनेकदा तर त्याच्याकडं भाडं देण्यासाठी देखील पैसे नसत. बँकेच्या खात्यात किमान रक्कम नसल्यानं त्याचं खातं बंद करण्यात आलेलं आहे. त्यानंतरही त्यानं हार मानली नाही.
( नक्की वाचा : चित्रपट प्रमोशनसाठी अफेयर्सच्या अफवा पसरवल्या जातात, सोनाली बेंद्रेनी सांगितली Inside Story )
विजयनं कठोर परिश्रम केले. त्याचा त्याला फायदा झाला. ही 'पेली चूपुलु' (2016) आणि अर्जुन रेड्डी (2017) या ब्लॉकबस्टर सिमेमानं सुपरस्टार अशी ओळख त्याला मिळाली. 2019 साली विजयनं स्वत:चं 'हाऊस किंग ऑफ द हिल एंटरटेनमेंट' हे प्रोडक्शन हाऊस सुरु केलंय. साऊथ इंडस्ट्री गाजवल्यानंतर विजय देवरकोंडानं बॉलिवूडकडं मोर्चा वळवला. अनन्या पांडेसोबत 2022 मध्ये 'लाइगर' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
करण जोहरच्या बॅनरनं बनवलेला हा सिमेमा बॉक्स ऑफिसवर सुपर फ्लॉप ठरला. 90 कोटी रुपये खर्चून बनवलेल्या या सिनेमानं फक्त 60.8 कोटींची कमाई केली. विजय देवरकोंडाला यापूर्वी 'कुशी' आणि 'द फॅमिली स्टार' या सिनेमांमध्ये पडद्यावर प्रेक्षकांनी पाहिलं. हे दोन्ही सिनेमे बॉक्स ऑफिसवर गाजले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world