जाहिरात
This Article is From May 03, 2024

चित्रपट प्रमोशनसाठी अफेयर्सच्या अफवा पसरवल्या जातात, सोनाली बेंद्रेनी सांगितली Inside Story

Sonali Bendre on Film Industry : मला तो प्रकार अजब वाटत होता, असं सोनालीनं सांगितलं.

चित्रपट प्रमोशनसाठी अफेयर्सच्या अफवा पसरवल्या जातात, सोनाली बेंद्रेनी सांगितली Inside Story
अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं (Sonali Bendre) फिल्म इंडस्ट्रीबाबतची एक इनसाईड स्टोरी शेअर केली आहे.
मुंबई:

Sonali Bendre on Film Industry : हिंदी चित्रपटसृष्टीतील चकाकत्या विश्वाचं अनेकांना आकर्षण असतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करण्यासाठी देशरातून अनेक तरुण-तरुणी मुंबईत येतात. त्यांना काम मिळवण्यासाठी स्ट्रगल करावा लागतो. या चित्रपट सृष्टीत नेमकं कसं काम चालंत याचीही अनेकांना उत्सुकता असते. अभिनेत्री सोनाली बेंद्रेनं (Sonali Bendre) फिल्म इंडस्ट्रीबाबतची एक इनसाईड स्टोरी शेअर केली आहे. 'आजकाल स्टार्सना तुमच्या सहकाऱ्यासोबत लिंक-अप असल्याच्या अफवा पसरली तर चालेल का? असं विचारलं जातं, असं सोनालीनं सांगितलं. News18 शी बोलताना सोनालीनं हा खुलासा केला आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

माझ्या करिअरमधील सुरुवातीच्या दिवसात गॉसिप फक्त चित्रपटांच्या प्रमोशनसाठी करण्यात येत असे. त्याबाबत कलाकारांना काही ऑप्शन नव्हता. गॉसिप आणि न्यूज मेकर्स वेगवेगळ्या निष्कर्षावर पोहोचत असत. तुम्ही कुणाशी फक्त बोलत असाल अथवा तुमचं कुणाशी भांडण झालं असेल यासारख्या गोष्टी लिहिल्या जात असतं. या गोष्टींच्या सत्यतेचा दूरपर्यंत काही संबंध नसे. 

सोनाली पुढं म्हणाली की, 'आमच्या काळात आम्हाला विचारलं देखील जात नसे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी गॉसिपचा वापर केला जात असते. बातम्यांमध्ये राहण्यासाठी मुख्य कलाकारांमध्ये लिंक-अप असल्याचं सांगितलं जात. हे इतक्या पद्धतशीरपणे होत असे की यापूर्वीही असंच घडलं असावं असं मला वाटत असे. पण, मला या गोष्टी अजब वाटल्या.'

(नक्की वाचा : जुने दिवस आठवून भावुक झाला सनी देओल, बॉबी तर रडूच लागला! म्हणाला, मुलाच्या लग्नानंतर...)

एखाद्या कलाकाराच्या बाबात काही विशिष्ट गोष्टी ठसवण्याचाही प्रयत्न केला जात आहे. मी मध्यमवर्गीय कुटुंबातून आलीय हे न सांगता श्रीमंत घरातून आली आहे, हे सांगण्याचा मला सल्ला देण्यात आला होता. मला याबाबत खोटं बोलणं जड जात असे. माझ्या अनेक सहकारी कलाकारांना हे करावं लागलं, असं सोनालीनं सांगितलं.

सोनालीचा आगामी प्रोजेक्ट

सोनाली बेंद्रेनं 1994 साली आग चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. सोनालीनं  दिलजले (1996), मेजर साब (1998), सरफरोश (1999), हम साथ साथ हैं (1999), और हमारा दिल आपके पास है (2000) या हिट सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्याचबरोबर अजीब दास्तां है ये (2014) आणि  द ब्रोकन न्यूज (2022) या वेब सीरिजमध्येही काम केलं आहे. न्यूजरुम ड्रामा असलेल्या 'द ब्रोकन न्यूज' च्या दुसऱ्या सिझनचा प्रीमियर 3 मे रोजी होणार आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com