VIDEO: शिवीगाळ, दादागिरी अन्.... प्रसिद्ध मराठी गायिकेला भररस्त्यात भयंकर अनुभव!

Singer Srinidhi Ghatate VIDEO: मराठी गायिका श्रीनिधी घटाटे आणि तिच्या होणाऱ्या पतीला इमॅजिका रिसॉर्टजवळ एका संतापजनक 'रोड रेज'च्या घटनेचा सामना करावा लागला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

प्रसिद्ध मराठी पार्श्वगायिका श्रीनिधी घटाटे हिला आणि तिच्या होणाऱ्या पतीला प्रवासादरम्यान भयंकर अनुभव आला आहे. इमॅजिका रिसॉर्टजवळ वाहतूक कोंडीत अडकलेली असताना, वाहतुकीचे नियम पायदळी तुडवणाऱ्या एका जोडप्याने श्रीनिधी आणि तिच्या होणाऱ्या पतीला अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. एवढेच नव्हे तर ते मारहाण करण्याच्या उद्देशाने थेट अंगावर धावून आले. या प्रकारामुळे प्रचंड अस्वस्थ झालेल्या श्रीनिधीने या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर करत थेट पोलिसांकडे टॅग केलं आहे.

नेमका प्रकार काय घडला?

गायिका श्रीनिधी घटाटेने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक व्हिडीओ आणि सविस्तर पोस्ट शेअर करत या रस्त्यावरील दादागिरीचा अनुभव सांगितला. श्रीनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ती आणि तिचा होणारा पती कारने त्यांच्या फार्महाऊसकडे जात होते. प्रवासादरम्यान इमॅजिका रिसॉर्टजवळ त्यांना प्रचंड मोठ्या ट्रॅफिक जॅमचा सामना करावा लागला. तेथे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. अशा परिस्थितीतही काही बेजबाबदार लोक सर्रासपणे नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या बाजूने गाड्या चालवून रस्ता ब्लॉक करत होते.

Advertisement

पाहा VIDEO

(नक्की वाचा-  IMD Rain Alert: महाराष्ट्र पाऊस कधी परतणार? मान्सूनबाबत मोठी अपडेट; 'या' जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज

नियम पाळण्याची विनंती केल्याने शिवीगाळ

याच वाहतूक कोंडीच्या गोंधळात चुकीच्या लेनमधून अत्यंत बेजबाबदारपणे येणाऱ्या एका दुचाकी चालकाने श्रीनिधीच्या कारला जवळपास धडक दिलीच होती. यानंतर, श्रीनिधीच्या होणाऱ्या पतीने त्या वाहनचालकाला योग्य लेनमधून गाडी चालवण्यास सांगितले. तसेच हा 'वन-वे' रस्ता नसल्याची आठवण करून दिली.

मात्र, स्वतःची चूक मान्य करून बाजूला होण्याऐवजी तो वाहनचालक आणि त्याच्या मागे बसलेली महिला स्कुटीवरून उतरून थेट आक्रमक झाले. त्यांनी श्रीनिधीच्या पतीला अत्यंत घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद इतका वाढला की ते दोघेही मारहाण करण्याच्या उद्देशाने त्यांच्या अंगावर धावून आले, असं श्रीनिधीने सांगितलं.

(नक्की वाचा-  KDMC News: कल्याण-डोंबिवलीकरांच्या जीवाशी खेळ! जलशुद्धीकरण केंद्रातील संतापजनक VIDEO समोर)

या भयावह अनुभवानंतर श्रीनिधीने सोशल मीडियावर आपला तीव्र संताप व्यक्त केला आहे. तिने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, "हा प्रकार अत्यंत अस्वस्थ करणारा आहे. कायदा पाळण्याची हीच किंमत आपल्याला मोजावी लागते का? आज जे प्रामाणिक नागरिक वाहतुकीचे नियम पाळतात, त्यांना अशा प्रकारे धमकावले जात आहे. तर दुसरीकडे नियम तोडणारे लोक गुंडांसारखे उजळ माथ्याने रस्त्यांवर फिरून इतरांवर दादागिरी करत आहेत."

पोलीसा महासंचालकांकडे कारवाईची मागणी

श्रीनिधी घटाटेने थेट राज्याच्या पोलीस महासंचालकांना आणि महाराष्ट्र पोलिसांना टॅग केले आहे. "अशा बेजबाबदार आणि हिंसक वर्तन करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, अशी मला पूर्ण आशा आहे," अशी  भूमिका तिने मांडली आहे. 
 

Advertisement

Topics mentioned in this article