जाहिरात

Stree-2 सिनेमाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई, 'या'चित्रपटाचं मोडलं रेकॉर्ड

स्त्री-2 मध्ये राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर याने अभिनय केला आहे. गेल्या एक महिन्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दबदबा निर्माण केला आहे.

Stree-2 सिनेमाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई, 'या'चित्रपटाचं मोडलं रेकॉर्ड
मुंबई:

हिंदी चित्रपट सृष्टीत सर्वाधिक कमाई करणारा म्हणून स्त्री-2  (Stree-2) हा चित्रपट ठरला आहे. त्याने कमाईच्याबाबतीत मातब्बरांच्या चित्रपटांना मात दिली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफसवर तब्बल 600 कोट रूपयांची कामाई केली आहे. या चित्रपटाने शाहारुखच्या जवान चित्रपटालाही कमाईच्या बाबतीत मागे सोडले आहे. स्त्री-2 मध्ये राजकुमार राव आणि  श्रद्धा कपूर याने अभिनय केला आहे. गेल्या एक महिन्यापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर दबदबा निर्माण केला आहे. 

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

शाहरुख खानच्या जवान चित्रपटाला स्त्री-2 ने कमाईच्या बाबतीत मागे टाकले आहे. जवानने 584  कोटींची कमाई केली होती. मात्र स्त्री-2 ने 34 दिवसांमध्येच जवळपास 600 कोटींचा गल्ला केला आहे. त्यामुळे हा चित्रपट सध्याच्या स्थितीत सर्वात जास्त गल्ला कमावणार चित्रपट ठरला आहे. (Stree 2 Box Office Collection Day 34 ) राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांचा  स्त्री 2 हा चित्रपट सध्या सिनेमाघरात प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. एक महिना झाला तरी हा चित्रपट पाहाण्यासाठी गर्दी होताना दिसत आहे. त्यामुळे या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड आपल्या नावावर केले आहेत. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनाखाली या हॉरर कॉमेडी चित्रपटाची निर्मिती झाली आहे. त्यामुळे पाचव्या आठवड्यातही करोडो रूपयांची कमाई चित्रपटाने केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - आर्या जाधवचं अमरावतीत जंगी स्वागत, बिग बॉसबाबत म्हणाली...

चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर 34 व्या दिवशीही चांगली कमाई स्त्री-2 ने केली आहे. हा चित्रपट 50 कोटींमध्ये तयार करण्यात आला होता. ही रक्कम कधीच वसूल झाली असून आता तर या चित्रपटाने तब्बल 600 कोटींचा गल्ला एकत्र करत निर्मात्यांना मालामाल केले आहे. शिवाय प्रत्येक दिवशी कोट्यवधींचा फायदा चित्रपटाला होत आहे. विशेष म्हणजे चित्रपटाने पाचव्या आठवड्यात ही करोडो रूपयांची कमाई केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी -  'राज ठाकरेंना महायुतीत घेण्याची गरज नाही' आता केंद्रीय मंत्री थेट बोलले

या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात अडीचशे कोटी पेक्षा जास्तचा गल्ला जमवला आहे. तर दुसऱ्या आठवड्या जवळपास दिडशे कोटीचा गल्ला या चित्रपटाचा झाला होता. तिसऱ्या आठवड्या 73 कोटी, चौथ्या आठवड्यात 37 कोटी कमाई केली. तर पाचव्या आठवड्यात जवळपास 17 कोटीची कमाई केली आहे. त्यामुळे 32 व्या दिवशी या चित्रपटाची एकूण कमाई ही तब्बल 584 कोटीच्या घरात असल्याचे समोर आले आहे. आदर्श यांनी ही आकडेवारी जाहीर केली आहे. 

ट्रेंडिंग बातमी - "राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य

या कामाई बरोबरच स्त्री 2 या चित्रपटाने इतिहास रचला आहे. हिंदी चित्रपटाच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट हा शाहरूख खान याचा जवान हा आहे. त्याने 584 कोटीची कमाई केली होती. ते रेकॉर्ड आता स्त्री 2 ने मोडीत काढले आहे. या चित्रपटाने आता 600 कोटीचं नवं रेकॉर्ड प्रस्थापित केले आहे. सहाव्या आठवड्यातही हा हॉरर कॉमेडी चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरत आहे. 

Switch To Dark/Light Mode
Previous Article
आर्या जाधवचं अमरावतीत जंगी स्वागत, बिग बॉसबाबत म्हणाली...
Stree-2 सिनेमाची बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कमाई, 'या'चित्रपटाचं मोडलं रेकॉर्ड
Chief Minister Eknath Shinde journey through drama Ashok Samel will present with son sangram
Next Article
CM Eknath Shinde : 'मला काही सांगायचंय...'; चित्रपटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रंगमंचावर!