
राज ठाकरे यांनी स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. असे असले तरी ऐन वेळी त्यांना महायुतीचे दरवाजे उघडले जातील अशीही चर्चा आहे. अशात आता राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची गरज नाही. त्यांचा काही उपयोग होणार नाही. लोकसभा निवडणुकीत त्यांचा काहीही उपयोग झाला नाही. त्यामुळे त्यांना महायुतीत घेवू नये अशी मागणी केंद्रीय मंत्र्यानेच केली आहे. एकीकडे राज ठाकरे यांना विरोध करताना दुसरीकडे या केंद्रीय मंत्र्याने अजित पवारांना मात्र हिरवा कंदील दाखवला आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नेहमीच राज ठाकरे यांच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी राज ठाकरेंना महायुतीत नो एन्ट्री अशीच थेट भूमिका घेतली आहे. डहाणू येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीत राज ठाकरेंचा महायुतीला फारसा फायदा झाला नाही. राज ठाकरे यांना महायुतीत घेण्याची गरज नाही. मी महायुतीत आहे. त्यामुळे मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय? असा प्रश्नही त्यांनी केला आहे. महायुतीत राज ठाकरे यांना घेण्यास आपला विरोध असल्याचेही ते म्हणाले.
ट्रेंडिंग बातमी - कलम 370 हटवल्यानंतर जम्मू- काश्मीरमध्ये आज मतदान, काश्मिरी पंडितांसाठी विशेष सोय
एकीकडे रामदास आठवले यांनी राज ठाकरे यांच्या महायुतीतील समावेशाला विरोध दर्शवला आहे. त्याच वेळी त्यांनी अजित पवारांबाबत सॉफ्ट कॉर्नर दाखवला आहे. अजित पवारांमुळे महायुतीला कोणतेही नुकसान झाले नाही. ज्या काही जागा महायुतीने लोकसभा निवडणुकीत जिंकल्या त्यात अजित पवारांचा निश्चितच वाटा आहे असेही आठवले यावेळी म्हणाले. महायुतीत अजित पवारांच्या समावेशामुळे महायुतीत तणाव आहे. अनेकांनी अजित पवारां विरोधात जाहीर भूमिका घेतली आहे. मात्र त्यांच्या समर्थनार्थ आठवले हे पुढे सरसावले आहेत.
ट्रेंडिंग बातमी - "राहुल गांधींच्या जीभेला चटके दिले पाहिजेत", भाजप खासदाराचं बेताल वक्तव्य
यावेळी आठवले यांनी राहुल गांधी यांच्यावर ही हल्लाबोल केला आहे. राहुल गांधी आणि त्यांचा काँग्रेस पक्ष संपेल मात्र देशातील आरक्षण कधीही संपणार नाही. देशाबाहेर जाऊन देशाबद्दल अशी वक्तव्य करणं राहुल गांधींना शोभत नाही. राहुल गांधींनी बालिशपणा सोडला पाहिजे. लोकशाही धोक्यात नाही, तर राहुल गांधी आणि काँग्रेस धोक्यात आहे असेही रामदास आठवले म्हणाले. राहुल गांधी यांचा पासपोर्ट रद्द करावा अशी मागणी ही आठवले यांनी केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world