ऋतिकसोबत बॅकग्राऊंड डान्सर, 'तो' 27 वर्षात बनला सुपरस्टार, 34 व्या वर्षी मृत्यू, TV अभिनेत्रीसोबत होतं अफेअर

बॉलिवूडमधील तो स्टार कलाकार आज आपल्या सोबत नाही,ज्याने कमी वयातच चित्रपटसृष्टीत छाप टाकली होती.

जाहिरात
Read Time: 2 mins
Famous Actor Died At 34
मुंबई:

Bollywood Star Shocking Story : बॉलिवूडमधील तो स्टार कलाकार आज आपल्या सोबत नाही,ज्याने कमी वयातच चित्रपटसृष्टीत छाप टाकली होती.या अभिनेत्याकडे देखणं व्यक्तिमत्व तर होतंच, पण अभिनय आणि जबरदस्त नृत्य करण्याची धमकही होती.या उगवत्या सिताऱ्याने चित्रपटात येण्यापूर्वी रंगभूमीवर अभिनय केला होता.त्यानंतर बॅकग्राऊंड डान्सर म्हणूनही काम केले होते.या अभिनेत्याने 2006 मध्ये प्रदर्शित झालेल्या सुपरहिट चित्रपट ‘धूम 2'च्या टायटल गाण्यात ऋतिक रोशनसोबत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं. पण कोणालाही स्वप्नातही वाटलं नाही की, ऋतिकच्या मागे नृत्य करणारा हा अभिनेता बॉलिवूडमध्ये स्टार बनेल.आज हा स्टार अभिनेता आपल्या सोबत नाही.पण सोशल मीडियावर त्याचा तो फोटो पुन्हा व्हायरल होत आहे, ज्यात तो ऋतिकच्या मागे नृत्य करताना दिसतो. कोण आहे हा स्टार अभिनेता? जाणून घेऊयात सविस्तर माहिती.

14 जून 2020 रोजी त्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू

हा स्टार अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही, तर बॉलिवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत आहे. 14 जून 2020 रोजी सुशांतचा मुंबईतील एका अपार्टमेंटमध्ये मृतदेह आढळला होता. त्याच्या मृत्यूने संपूर्ण बॉलिवूडला हादरा बसला होता. सुशांतची हत्या झाली की त्याने आत्महत्या केली? असा सवाल उपस्थित झाल्यावर तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली होती. आजही सुशांतचे कुटुंबीय न्यायासाठी लढा देत आहेत.दरम्यान, सुशांतने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाच्या जोरावर खूप नावलौकीक केलं आहे. बॉलिवूड सिनेमे करण्यापूर्वी सुशांतने रंगभुमीवर (नाटक) काम केलं होतं. विशेष म्हणजे, त्याने ऋतिक रोशन,अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांच्या प्रमुख भूमिका असलेला अॅक्शन चित्रपट ‘धूम २'मध्ये सुशांत सिंह राजपूतही बॅकग्राऊंड डान्सर म्हणून झळकला होता. 

नक्की वाचा >> Viral Video: 'पाहण्याच्या' कार्यक्रमात 'बसण्याचे' नियोजन, कांदे पोह्यांऐवजी मुलीने पेग भरून आणले

‘काय पो चे' या चित्रपटातून सुशांत सिंग राजपूत चमकला

सुशांत सिंह राजपूतला ‘धूम २'च्या टायटल गाण्यात ऋतिक रोशनसोबत बॅकग्राऊंड डान्सर म्हणून पाहिलं गेलं. सोशल मीडियावर एक फोटो वारंवार व्हायरल होत आहे.या व्हायरल फोटोमध्ये सुशांत ऋतिक रोशनच्या पाठीमागे नृत्य सादर करताना दिसतो आहे.हे गाणे सुशांतच्या चाहत्यांना खूप आवडत आहे आणि अनेकांनी कमेंटमध्ये लिहिले आहे की ते फक्त सुशांतसाठी हे गाणे पुन्हा पाहायला आले आहेत. टीव्हीच्या दुनियेतून चित्रपटात आलेल्या सुशांतला ‘काय पो चे' या चित्रपटातून ओळख मिळाली होती. त्या वेळी त्याचे वय फक्त २७ वर्षे होते. त्यानंतर ‘छिछोरे' या चित्रपटातून त्याला सुपरस्टारचा दर्जाही मिळाला.पण दुःखदायक बाब म्हणजे २०२० मध्ये ३४ वर्षांचा सुशांतचा अचानक मृत्यू झाला.

नक्की वाचा >>  30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल