जाहिरात
This Article is From Apr 27, 2024

तारक मेहता का उल्टा चश्मामधील सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, सोशल मीडियावरील शेवटचे पोस्ट चर्चेत

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: तारक मेहता का उल्टा चश्मामधील अभिनेते गुरूचरण सिंग चार दिवसांपासून बेपत्ता आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अभिनेत्याची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

तारक मेहता का उल्टा चश्मामधील सोढी 4 दिवसांपासून बेपत्ता, सोशल मीडियावरील शेवटचे पोस्ट चर्चेत
सोढीची इन्स्टाग्रामवरील शेवटची पोस्ट व्हायरल

Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चश्मा'मधील रोशन सिंग सोढीची भूमिका निभावणारे अभिनेते गुरूचरण सिंग गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे. सोढी बेपत्ता असल्याचे वृत्त पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. नवी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेते गुरूचरण सिंग (वय 50 वर्ष) बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी नोंदवली आहे. तपासादरम्यान 22 एप्रिलचे सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांच्या हाती लागले आहे. या घडामोडींदरम्यान इन्स्टाग्रामवरील त्यांचे शेवटचे व्हिडीओ पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

सोशल मीडियावरील गुरूचरण सिंग यांची शेवटचे पोस्ट

वडिलांच्या वाढदिवसानिमित्त गुरूचरण सिंग यांनी इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या खास पद्धतीने शुभेच्छा दिल्या आहेत. या व्हिडीओ पोस्टवर चाहत्यांकडून मोठ्या प्रमाणात कमेंट्स करण्यात येत आहेत. चाहतावर्ग त्यांच्या सुखरूपतेसाठी प्रार्थना करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की,' आपण सुरक्षित असाल, अशी प्रार्थना करतो'. आणखी एका युजरने म्हटलं आहे की, 'घरी या सोढीभाई!'

(नक्की वाचा: श्रुती हासन आणि शांतनूचे ब्रेकअप झाले, अभिनेत्रीच्या पोस्टमुळे कळली बातमी)

पोलिसांच्या हाती लागले सीसीटीव्ही फुटेज

पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, मुंबईत दाखल होण्यासाठी गुरूचरण सिंग 22 एप्रिल 2024 रोजी प्रवास करणार होते. विमानतळावर पोहोचण्यासाठी सकाळी 8.30 वाजताच ते घरातून बाहेर पडले. पण ते मुंबईमध्ये पोहोचलेच नाहीत आणि फोनच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. यानंतर पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. तपासादरम्यान पोलिसांच्या हाती सीसीटीव्ही फुटेज लागले आहे, ज्यामध्ये अभिनेते 22 एप्रिल रोजी रात्री 9 वाजून 14 मिनिटांनी दिल्लीच्या पालम परिसरातील परशुराम चौकामध्ये कुठेतरी पायी जाताना दिसत आहेत. सीसीटीव्ही फुटेजमध्ये गुरूचरण चालत असून त्यांच्या पाठीवर एक बॅग देखील दिसत आहे.

(नक्की वाचा: Salman Khan House Firing Case: आरोपींकडे होती 40 काडतुसे, गोळीबारानंतर 3 वेळा बदलले कपडे)

प्रेक्षकांमधील लोकप्रिय पात्र 

गुरूचरण सिंग यांनी 'तारक मेहता का उल्ट चश्मा' मालिकेमध्ये रोशन सिंग सोढीची भूमिका निभावली होते. प्रेक्षकांमध्ये हे पात्र अतिशय लोकप्रिय आहे. पण वडिलांच्या आरोग्याच्या कारणास्तव त्यांनी मालिकेतून एक्झिट घेतली, त्यावेळेस चाहतावर्ग नाराज झाला होता. दुसरीकडे आता त्यांच्या बेपत्ता झाल्याच्या वृत्तामुळे चाहते चिंतेत आहेत.

VIDEO: डरकाळ्या फोडणारा बिबट्या आणि रेस्क्यू ऑपरेशनचा थरार  

Listen to the latest songs, only on JioSaavn.com