राहुल कुलकर्णी, पुणे: पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय आणि डॉ. सुश्रुत घैसास यांच्या हलगर्जीपणामुळे झालेल्या तनिषा भिसे मृत्यूप्रकरणामुळे दीनानाथ रुग्णालयास 10 लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. धर्मादाय रुग्णालयात येणाऱ्या कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम घेण्यास मनाई करणारी कायदेशीर तरतूद करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने तयार केला आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुण्यातील तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतर राज्य सरकारने धर्मादाय रुग्णालयांसाठीच्या नियमावलीत महत्त्वाचे बदल प्रस्तावित केले असून त्यासंदर्भातील आदेश लवकरच जारी होतील, असे उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी सांगितले. धर्मादाय रुग्णालय अशी नोंदणी असलेल्या रुग्णालयांमधील रुग्णसेवा पूर्णपणे ऑनलाईन ठेवावी लागेल. त्याचे केंद्रीय स्तरावरून नियोजन मुख्यमंत्री धर्मादाय कक्षाच्या माध्यमातून होईल.
या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अनामत रक्कम घेण्यावर बंदी घालण्यात येणार असून रुग्णालयाने 10 टक्के निधी गरीब रुग्णांसाठी वापरला आहे किंवा नाही, याचे हिशेब नियमितपणे धर्मादाय आयुक्तांकडे सादर करावे लागतील. वैद्याकीय शिक्षण विभागाकडून दीनानाथ रुग्णालयाच्या झालेल्या चौकशीनंतर डॉ. घैसास व संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले.
राष्ट्रीय वैद्याकीय परिषदेच्या (इंडियन मेडिकल कौन्सिल) नियमांचे उल्लंघन झाल्याने डॉ. घैसास व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची शिफारस करण्यात आली आहे. दीनानाथ रुग्णालयास करण्यात आलेल्या 10 लाखरुपये दंडाच्या रकमेतून भिसे यांच्या दोन मुलींच्या नावे प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मुदत ठेवी केल्या जातील व त्या मुली सज्ञान झाल्यावर ही रक्कम त्यांना मिळणार आहे.
ट्रेंडिंग बातमी - Rane vs Rane: 'राणे बंधू एकमेकांच्या उरावर बसणार' माजी खासदार असं का बोलले?