जाहिरात
This Article is From Jul 01, 2024

Viral Video : थलापती विजयसोबत विद्यार्थिनीने काय केलं? फॅन्स भडकले

विजय चेन्नीतील तमिलगा वेत्री कझगमद्वारे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झाला होता. जिथे  दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता.

Viral Video : थलापती विजयसोबत विद्यार्थिनीने काय केलं? फॅन्स भडकले
तलपती विजय का वीडियो हुआ वायरल

साऊथ सुपरस्टार थलापती विजयची फॅन फॉलोइंग मोठी आहे. विजयसोबत एक फोटो काढणे त्याच्या अनेक फॅन्सचं स्वप्न असतं. मात्र एका व्हायरल व्हिडीओमध्ये विजयसोबत जे घडलं ते पाहून त्याचे फॅन्सच चकीत झाले आणि भडकले. विजयने फोटो काढताना एका विद्यार्थिनीच्या खांद्यावर हात ठेवला. मात्र विद्यार्थिनी हात हटवताना व्हिडीओ दिसत आहे. 

विजय चेन्नीतील तमिलगा वेत्री कझगमद्वारे आयोजित वार्षिक पुरस्कार वितरण सोहळ्यात सहभागी झाला होता. जिथे  दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी या घडलेल्या प्रकारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

व्हिडीओत दिसत आहे की दोन विद्यार्थिनी थलापती विजयसोबत उभ्या आहेत. विजय दोन विद्यार्थिंनीसोबत फोटो काढताना दिसत आहे. यावेळी विजय विद्यार्थिनीच्या खांद्यावर हात ठेवताना दिसला. मात्र हात ठेवताच विद्यार्थिनीने विजयचा हात हटवला. मात्र हा अर्धवट व्हिडीओ आहे. 

मात्र एका यूजरने अर्धाच व्हिडीओ शेअर केल्याने फॅन्समध्ये नाराजी दिसली. त्यानंतर फॅन्सनी सोशल मीडिया पूर्ण व्हिडीओ देखील शेअर केला. ज्यामध्ये दिसत आहेत की, विद्यार्थिनीने विजयचा हात हातात घेत पोझ देत फोटो काढला. मात्र व्ह्यूज वाढवण्यासाठी असे व्हिडीओ शेअर केल्याने विजयच्या फॅन्सनी अनेक कमेंट्स देखील केल्या आहेत.