जाहिरात

तो 62 वर्षांचा, ती 32 वर्षांची; तुफानी स्टंट करणारा अभिनेता मादक अभिनेत्रीच्या प्रेमात? 

लंडनच्या रस्त्यावर दोघांना पाहताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.

तो 62 वर्षांचा, ती 32 वर्षांची; तुफानी स्टंट करणारा अभिनेता मादक अभिनेत्रीच्या प्रेमात? 

Tom Cruise : मिशन इम्पॉसिबल (Mission Impossible star) आणि टॉपगनसारख्या चित्रपटात जबरदस्त भूमिका साकारणारे हॉलिवूड स्टार टॉम क्रूज हा अभिनेत्री एना डी आर्मस हिला (Tom Cruise and Ana de Armas) डेट करीत असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. टॉम आणि आर्मस हे दोघे लंडनमधील स्वायर माइलवर रात्रीच्या वेळी फिरताना दिसले. व्हेलेंटाइनच्या दिवशी (Valentine's Day) दोघांना एकत्र पाहून नव्या चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे टॉम आपल्या निम्म्या वयाच्या अभिनेत्रीच्या प्रेमात असल्याची चर्चा आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

लंडनच्या रस्त्यावर दोघांना पाहताच चाहत्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. अनेकांनी टॉमसोबत सेल्फी काढण्यासाठी इच्छा व्यक्त केली. टॉमदेखील हसतमुखाने सर्व चाहत्यांना सामोरं जात होता. आतापर्यंत टॉमसोबत अनेक तरुणींची नावं जोडली गेली आहेत.

Latest and Breaking News on NDTV

काही दिवसांपूर्वी टॉम क्रूज याचं नाव 36 वर्षांची रशियन सोशलाइट Elsina Khayrova हिच्याशी जोडलं जात होतं. त्यानंतर आता एना डी आर्मस हिच्यासोबत पाहून टॉम पुन्हा प्रेमात पडल्याचं म्हटलं जात आहे.

Cobra Kai Season 6:  कराटे प्रेमींमध्ये जबरदस्त क्रेझ असलेल्या सीरिजची प्रतीक्षा संपली! कुठे पाहणार?

नक्की वाचा - Cobra Kai Season 6: कराटे प्रेमींमध्ये जबरदस्त क्रेझ असलेल्या सीरिजची प्रतीक्षा संपली! कुठे पाहणार?

तीन लग्न आणि तीन मुलांचे वडील...
टॉम याला तीन मुलं आहेत. आणि आतापर्यंत तो तीन वेळा लग्नबंधनात अडकला आहे. टॉमचं पहिलं लग्न मिमी रोगर्सशी 1987 मध्ये झालं होतं. दोघे अवघ्या तीन वर्षांनंतर 1990 मध्ये वेगळे झाले. यानंतर टॉमच्या आयुष्यात त्याच वर्षी निकल किडमनची एन्ट्री झाली. यानंतर दोघे 2001 मध्ये वेगळे झाले. हे नातं तुटल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी 2006 मध्ये टॉमने केटी होम्ससोबत लग्न केलं. मात्र हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. 2012 मध्ये दोघेही वेगळे झाले.