जाहिरात

Valentine's Day 2025 : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! मराठी कलाकारांनी साजरा केला व्हॅलेंटाईन डे

Valentine's Day 2025 : मराठी कलाकारांनी कसा साजरा केला व्हॅलेंटाइन डे पाहा Valentine's Day Celebrationचे फोटो आणि व्हिडीओ...

Valentine's Day 2025 : प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं! मराठी कलाकारांनी साजरा केला व्हॅलेंटाईन डे

Valentine's Day 2025 : जगभरात 'व्हॅलेंटाईन डे' हा प्रेमाचे प्रतीक असणारा दिवस म्हणून साजरा केला जातो. तरुण किंवा तरुणी त्यांना आवडणाऱ्या व्यक्तीकडे आपले प्रेम व्यक्त करतात किंवा जी मंडळी प्रेमात असतात ती अनोख्या पद्धतीने आजचा दिवस साजरा करून आयुष्यभर एकमेकांसोबत घालवण्याच्या आणाभाका घेतात. मराठी कलाकारांनीही आजच्या दिवसानिमित्ताने त्यांच्या प्रिय व्यक्तीबद्दलच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Instagram वर फोटो, व्हिडीओ शेअर करत, मस्त मस्त कॅप्शन देत, रिल्सना रोमँटिक गाण्यांचा साज चढवत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. मराठीतले हे कोण कलाकार आहेत, आणि त्यांनी आपले प्रेम कसे व्यक्त केले आहे चला पाहूयात. महाराष्ट्राला परिचित असलेल्या पाटील बाई आणि राणा दा अर्थात अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी यांची जोडी फार प्रसिद्ध झाली होती. या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. अक्षयाने एक खास व्हिडीओ व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रेकॉर्ड केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने हार्दिकचा हातात घेतला असून या दोघांकडे गाडीबाहेरून कोणीतरी पाहात असतं असं दिसतं आहे. गाडीबाहेरून या दोघांना पाहणारी व्यक्ती कोण आहे ते या व्हिडीओमधून तुम्हाला कळू शकेल.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अभिनेत्री सुखदा खांडकेकर आणि अभिनेता अभिजीत खांडकेकर यांचीही जोडी खूप प्रसिद्ध आहे. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने सुखदानेही एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये हे दोघे बर्फाळ प्रदेशात फिल्मी स्टाईलने प्रेमाचे क्षण साजरे करताना दिसत आहेत.

मराठी सिने तसेच मालिका विश्वातील आघाडीची अभिनेत्री असलेल्या हृता दुर्गुळेने चित्रपट दिग्दर्शक प्रतीक शाह याच्यासोबत लग्न केलं आहे. खांडकेकर दाम्पत्याप्रमाणे हे दाम्पत्यही बर्फाळ प्रदेशात फिरायला गेले असून तिथे काढलेले फोटो हृताने इन्स्टाग्पामवर अपलोड केले आहे. या पोस्टसाठीच्या कॉमेंटमध्ये तिने लिहिलंय की , "Thank you for choosing me every single day ❤️✨" अभिनेत्री सोनाली खरेकडे आजही पाहिल्यानंतर तरुणांच्या तोंडून 'ऊफ्फ तेरी अदा' असे उद्गार निघतात. सोनालीने तिचा नवरा आणि अभिनेता बिजय आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. फोटोमध्ये सोनालीने गोल्डन कलरची साडी आणि त्याच रंगाचा स्लीव्हलेस ब्लाऊज घातला असून बिजयने पांढऱ्या रंगाचा गळाबंद जोधपुरी परिधान केला आहे. या फोटोंसाठी सोनालीने "Just two of us ❤️" अशी कॉमेंट लिहिली आहे.

(नक्की वाचा:Happy Valentine's Day 2025: प्रेमाचा संदेश पाठवून पार्टनरसोबत साजरा करा व्हॅलेंटाइन डे)

दिग्दर्शक समीर विद्धंस आणि त्यांची पत्नी सायली यांनी 14 फेब्रुवारी रोजीच लग्नगाठ बांधली होती. सायलीने गेल्यावर्षी, याच दिवशी असे म्हणत लग्नाच्यावेळचा व्हिडीओ शेअर केला आहे.

(नक्की वाचा:Valentines Day 2025: व्हॅलेंटाइन डेला पार्टनरला राशीनुसार द्या गिफ्ट, नाते होईल अधिक मजबूत)