जाहिरात

Valentines Day 2025: व्हॅलेंटाइन डेला पार्टनरला राशीनुसार द्या गिफ्ट, नाते होईल अधिक मजबूत  

Valentine’s Day 2025 Gift : फेब्रुवारी महिना हा प्रेमाचा महिना मानला जातो. 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. या दिवशी पार्टनरला राशीनुसार गिफ्ट दिल्यास नात्यातील गोडवा वाढण्यास मदत मिळू शकते. 

Valentines Day 2025: व्हॅलेंटाइन डेला पार्टनरला राशीनुसार द्या गिफ्ट, नाते होईल अधिक मजबूत  
Valentines Day Gift Ideas : पार्टनरला त्याच्या/तिच्या राशीनुसार द्या गिफ्ट

Valentine's Day 2025: दरवर्षी 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाइन डे साजरा केला जातो. प्रेमी युगुलांसाठी हा दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो. व्हॅलेंटाइन डे म्हणजे प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा दिवस. बदलत्या लाइफस्टाइलनुसार व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याच्या पद्धतीही बदलल्या आहेत. 7 फेब्रुवारीपासून ते 14 फेब्रुवारीपर्यंत व्हॅलेंटाइन वीक साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन डे साजरा करून या प्रेमाच्या आठवड्याची सांगता केली जाते. व्हॅलेटाइन डेला आवडत्या व्यक्तीसमोर प्रेमाच्या भावना व्यक्त केल्या जातात. व्हॅलेंटाइन डे म्हटलं की गिफ्ट आलेच. पण यंदा नेहमीचेच गिफ्ट देण्याऐवजी काहीतरी हटके प्लॅन करा. तुमच्या पार्टनरला त्यांच्या राशीनुसार भेटवस्तू द्या. यामुळे तुमच्या प्रेमसंबंधांवर सकारात्मक परिणाम होऊ शकतात. कोणत्या राशीनुसार कोणते गिफ्ट द्यावे, याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

राशीनुसार तुमच्या पार्टनरला द्या हे गिफ्ट (Gifts for partner according to your zodiac sign)

मेष रास
मेष राशीनुसार पार्टनरला लाल रंगाचे एखादे गिफ्ट द्यावे. उदाहरणार्थ लाल रंगाचा ड्रेस, लाल रंगाचे फुल किंवा लाल रंगाचा टेडी देऊ शकता. 

वृषभ रास
वृषभ रास असणाऱ्या लोकांसाठी पांढरे, चॉकलेटी किंवा खाकी रंगाचे गिफ्ट देणे फायदेशीर ठरू शकते.  

मिथुन रास
मिथुन राशीच्या लोकांकरिता हिरव्या रंगाचे गिफ्ट देऊ शकता. यामुळे तुमच्या प्रेमसंबंधामध्ये सकारात्मक परिणाम पाहायला मिळतील. हिरव्या रंगाचे कोणतेही गिफ्ट तुम्ही पार्टनरला देऊ शकता. 

(नक्की वाचा: Valentine Week 2025: प्रेमाचा आठवडा झाला सुरू, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत जाणून घ्या व्हॅलेंटाइन वीकची पूर्ण लिस्ट)

कर्क रास
ज्योतिषशास्त्रानुसार कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, जर तुमच्या पार्टनरची रास कर्क असेल त्याला/तिला पांढऱ्या रंगाचे फुल दिल्यास नाते मजबूत होऊ शकते. 

सिंह रास
सिंह राशीच्या लोकांना व्हॅलेंटाइन डेनिमित्त तुम्ही पिवळ्या रंगाचे गिफ्ट देऊ शकता. झुमके, फुल किंवा पिवळ्या रंगाचा ड्रेस गिफ्ट देऊ शकता.  

कन्या रास
कन्या रास असल्यास निळ्या रंगाचे गिफ्ट देणे अधिक फायदेशीर ठरू शकते.  

(नक्की वाचा: Valentine Day 2025: सिंगल लोकांचाही व्हॅलेंटाइन डे होईल खास; फक्त 'हे' करा)

तूळ रास 
तूळ रास असल्यास पार्टनरला कमळाचे फुल द्यावे. जे तुमच्या नात्यासाठी अतिशय शुभ ठरू शकते. 

वृश्चिक रास
लाल किंवा मरुन रंगाची एखादी वस्तू गिफ्ट देऊ शकता. 

धनु रास
सोन्याचा एखादा दागिना उदाहरणार्थ अंगठी, लॉकेट किंवा इअररिंग्ज भेट म्हणून देऊ शकता. 

मकर रास
पिवळ्या रंगाचे गुलाब देणे तुमच्या नात्यासाठी फायद्याचे ठरू शकते.  

कुंभ रास
गिफ्ट देण्यासाठी ड्रेस किंवा ग्रीटिंग कार्डची निवड करू शकता.   

मीन रास
पिवळा रंग शुभ ठरू शकतो. त्यामुळे एखादे फुल किंवा ड्रेस खरेदी करू शकता. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)