
Happy Kiss Day 2025 : व्हॅलेंटाइन वीकमधील सातव्या दिवशी (Valentine Day 2025) प्रेमी युगुल किस डे साजरा करतात. आठवडाभर सुरू असणाऱ्या सेलिब्रेशनमधील हा दिवस संस्मरणीय ठरावा, यासाठी कपल वेगवेगळे प्लॅन करतात. किस डेच्या तुमच्या प्लॅनिंगमध्ये काही रोमँटिक मेसेजचाही समावेश करा, म्हणजे तुमचा पार्टनर नक्कीच खूश होईल. किस डेच्या दिवशी जोडीदाराला खास मेसेज पाठवा आणि त्याच्या/तिच्या चेहऱ्यावरील आनंद तुमच्या डोळ्यांच्या कॅमेऱ्यामध्ये टिपून ठेवा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
हॅपी किस डे 2025 मेसेज | Happy Kiss Day 2025 Wishes In Marathi
कपाळाचे चुंबन घेताना
जेव्हा तिची नजर झुकते
माझ्या हृदयाची अवस्था आणखी विचित्र होते
जेव्हा ती लाजून हसते
हॅपी किस डे 2025 | Happy Kiss Day 2025
संध्याकाळ प्रेमाच्या रंगात बुडून जावो
एका नव्या प्रवासाचा संदेश घेऊन
तुझे-माझे हृदय एक होवो
आपले नाते मरेपर्यंत टिकून राहो
हॅपी किस डे 2025 | Happy Kiss Day 2025
पावसामध्ये तुझ्यासोबत भिजायचंय
स्वप्न माझे किती गोड आहे
अगदी तुझ्या ओठांवरील हास्याप्रमाणे
हॅपी किस डे 2025 | Happy Kiss Day 2025
(नक्की वाचा: Valentine Week 2025: प्रेमाचा आठवडा झाला सुरू, 7 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीपर्यंत जाणून घ्या व्हॅलेंटाइन वीकची पूर्ण लिस्ट)
तू काही बोलू नकोस, मी देखील व्यक्त होणार नाही
मनाला मनाची भाषा कळू दे
प्रेमाचे आलिंगन देऊ
आणि असेच कायम सोबत राहू
हॅपी किस डे 2025 | Happy Kiss Day 2025
(नक्की वाचा: Hug Day 2025 : हग डे का साजरा केला जातो? काय आहेत फायदे?)
एकच व्यक्ती आयुष्यात कायम राहावी
एकाच व्यक्तीने भरभरून प्रेम करावे
एकाच व्यक्तीने शेवटपर्यंत साथ निभवावी
एकाच व्यक्तीने आभाळासारखी माया करावी
हॅपी किस डे 2025 | Happy Kiss Day 2025
मला तुझ्या मिठीत राहू दे
तुझ्या श्वासामध्ये माझा श्वास एकरुप होऊ दे
हृदय धडधड आणि अधीर मन
तुझ्या एका स्पर्शासाठी आतूर मी झालो
हॅपी किस डे 2025 | Happy Kiss Day 2025
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world