4 hours ago

Asha Bhosle Funeral Live Updates: ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे वयाच्या 92व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांनी शेवटचा श्वास घेतला. छातीमध्ये संसर्ग झाल्याने आणि थकवा जाणवल्याने आशा भोसले यांना शनिवारी (11 एप्रिल) संध्याकाळी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते, रविवारी शरीराचे अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले. लता मंगेशकर यांच्या धाकट्या बहीण असलेल्या आशा यांनी 'दम मारो दम', 'ये मेरा दिल' आणि 'रमैया वस्तावैया' यासारख्या गाण्यांसह 20 भाषांमध्ये 12,000 गाणी गायली. त्यांना पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण यासारख्या अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. आज सकाळी 11 वाजेपासून  ते दुपारी 3 वाजेपर्यंत त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे. तर दुपारी 4 वाजता दादर येथील स्मशानभूमीवर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडतील. 

आशा भोसले अंत्यसंस्कार लाइव्ह अपडेट्स | Asha Bhosle Funeral Live Updates

Apr 13, 2026 17:26 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले अनंतात विलीन

शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीक आशा भोसले यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार पार पडले. आशा भोसले यांच्या पार्थिवाला मुखाग्नी दिला असून त्या अनंतात विलीन झाल्या आहेत. यावेळी भोसले, मंगेशकर कुटुंबीयांसह बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रिटी आणि राजकीय नेते उपस्थित होते. 

Apr 13, 2026 17:19 (IST)

Asha Bhosle Funeral Live Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवाला देण्यात आला मुखाग्नी

Asha Bhosle Funeral Live Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवाला मुखाग्नी देण्यात आला. त्या आधी त्यांना शासकीय मानवंदना देण्यात आली. यावेळी त्यांच्या कुटुंबीयांना आश्रू  अनावर झाले होते. अनेकांनी आशाताईंचा यावेळी शेवटचा निरोप घेतला.   

Advertisement
Apr 13, 2026 16:50 (IST)

Asha Bhosle News: थोड्याच वेळात आशा भोसले यांचे अंत्यसंस्कार सुरु होणार

आशा भोसले यांचं पार्थिव शिवाजी पार्क स्मशानभूमीत दाखल झालं असून थोड्याच वेळात अंत्यसंस्कार सुरु होणार आहेत.

Apr 13, 2026 15:13 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांचं पार्थिव शिवाजी पार्ककडे रवाना

सूरसम्राज्ञी आशा भोसले यांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानाहून शिवाजी पार्ककडे निघाले आहे. हजारो चाहत्यांसह नातेवाईक आणि सेलिब्रिटी लोक या अत्यंयात्रेत सहभागी झाले आहेत. आशाताईंचं पार्थिव पाहून अनेकांचे डोळे पाणावले आहेत.

Apr 13, 2026 13:17 (IST)

Asha Bhosle News: शिवसेनेचे (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आशा भोसले यांना अखेरचा निरोप दिला

Apr 13, 2026 13:15 (IST)

Asha Bhosle Funeral: अभिनेता रितेश देशमुखने आशा भोसले यांचे अंतिम दर्शन घेतले

Advertisement
Apr 13, 2026 13:14 (IST)

Asha Bhosle: राशप खासदार सुप्रिया सुळे यांनी आशा भोसले यांचे अंतिम दर्शन घेतले

Apr 13, 2026 11:39 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांना अखेरचा निरोप देताना सचिन तेंडुलकर भावुक

Advertisement
Apr 13, 2026 10:49 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांचा शासकीय सन्मान

Apr 13, 2026 10:49 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांचा शासकीय सन्मान

Apr 13, 2026 10:48 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

Apr 13, 2026 09:36 (IST)

Asha Bhosle News: Sand Animation Artist मानस साहू यांच्याकडून आशा भोसले यांना अनोखी श्रद्धांजली

Apr 13, 2026 09:33 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी ए.आर. रहमान दाखल

Apr 13, 2026 07:46 (IST)

Asha Bhosle News: आशा भोसले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी लोअर परळ येथील निवासस्थानी ठेवण्यात येणार आहे

Apr 13, 2026 07:43 (IST)

Asha Bhosale News: आशा भोसलेंनी माझ्यासाठी गायलेली सर्व गाणी सुपरहिट ठरली: ऋतुपर्णा सेनगुप्ता

Asha Bhosale News: मी खूप भाग्यवान आहे की आशाजींनी माझ्या 2-3 चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले आणि ती सर्व गाणी सुपरहिट झाली: ऋतुपर्णा सेनगुप्ता, अभिनेत्री आणि निर्माती

Apr 13, 2026 07:41 (IST)

Asha Bhosale News: आशा भोसले देशाच्या अभिमान: अभिनेते गोविंद नामदेव

Asha Bhosale News: आशा भोसले देशाच्या अभिमान होत्या आणि त्यांच्यासारख्या अद्वितीय गायिका नाहीत: अभिनेते गोविंद नामदेव  

Apr 13, 2026 07:34 (IST)

Asha Bhosale: आशा भोसलेंची नात आहे बॉलिवूडची सुपरस्टार, 16व्या वर्षीच सलमान खानच्या सिनेमाची ऑफर येथे क्लिक करा

Asha Bhosale Granddaughter: आशा भोसले यांची बॉलिवूडमधील सुपरस्टार नात माहितीये का? वयाच्या 16व्या वर्षी सलमान खानसोबत काम करण्यास तिने नकार दिला होता.

Apr 13, 2026 07:33 (IST)

Asha Bhosle Funeral Updates: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली

तीन वर्षांपूर्वी धडाक्यात नव्वदी साजरी करणार्‍या आशाताईंच्या निधनाचे वृत्त अतिशय दु:खद आहे. त्यांच्या निधनाने मंगेशकर घराण्यातील लतादीदींनंतर आणखी एक तारा निखळला आहे. सुरांची सुंदर बाग आज उजाड झाली, अशी शोकमग्न भावना व्यक्त करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

"आशाताईंचा आवाज म्हणजे संगीताचा आत्मा होता. गायनातील बारमाही हिरवा ऋतू आणि भावभावनांचा सुरेल असा महासागर म्हणजे आशाताई. ‘तोरा मन दर्पण कहलाए’ अशा भावपूर्ण गाण्यापासून ‘खल्लास’पर्यंत अनेक मूडची गाणी लीलया गाणार्‍या आशाताई भोसले यांनी भक्तिगीत, भावगीत, नाट्यसंगीत, गझल, शास्त्रीय संगीत, रवींद्र संगीत, लोकगीते, पॉप असे अनेक संगीत प्रकारांचे गायन करताना त्यावर आपला वेगळा ठसा उमटवला. मराठी, हिंदी, बांगलासह 20 भारतीय भाषा आणि विदेशी भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी त्यांनी गायली. ‘महाराष्ट्र भूषण’सारखा ‘बांगला विभूषण’ पुरस्कारही त्यांना बहाल केला गेला. बदलांना सहजरित्या आत्मसात करणार्‍या अशा अष्टपैलू गायिका पुन्हा होणे नाही. अलिकडेच जागतिक रेडिओ दिनाच्या कार्यक्रमात आम्ही सोबत होतो, त्यांनी आग्रह करुन ‘अभी ना जाओ छोडकर...’ हे गाणे माझ्याकडून गाऊन घेतले होते आणि ‘पहा मी मुख्यमंत्र्यांना गाणं गायला लावले’, असे म्हणाल्याही होत्या. त्या आशाताईंचा सहवास आता आपल्याला लाभणार नाही, ही कल्पनाच करवत नाही. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि देशभरातील असंख्य चाहत्यांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.