जाहिरात

Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसलेंच्या नातीचं या क्रिकेटरसोबत आहे खास नाते, बॉलिवूड एण्ट्रीसाठी सज्ज

Zanai Bhasle: प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांची नात जनाई भोसलेला ओळखता का?

Zanai Bhosle: कोण आहे जनाई भोसले? आशा भोसलेंच्या नातीचं या क्रिकेटरसोबत आहे खास नाते, बॉलिवूड एण्ट्रीसाठी सज्ज
"Zanai Bhosle News: आशा भोसले यांच्या नातीला ओळखता का?"

Zanai Bhosle News: प्रसिद्ध पार्श्वगायिका आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल) निधन झाले. शनिवारी संध्याकाळी त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सोशल मीडियावर त्यांच्याबाबत पोस्ट व्हायरल होऊ लागल्यानंतर नात जनाई भोसलेने आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत माहिती देत सांगितले की, आजीला अतिशय थकवा जाणवत असल्याने आणि छातीत संसर्ग (Infection) झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर आशा भोसले यांच्यासोबतचा फोटो शेअर करत जनाईने आजीच्या प्रकृतीबाबत अपडेट दिले होते.

आशा भोसले यांच्या प्रकृतीबाबत दिले होते अपडेट

खूप कमी लोकांना माहिती आहे की, जनाई भोसले ही आशा भोसले यांचा मुलगा आनंद भोसले यांची मुलगी आहे. आजीप्रमाणेच तिने गायनात आपले नशीब आजमावले आहे. आता ती 'द प्राइड ऑफ भारत: छत्रपती शिवाजी महाराज' या सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. इन्स्टाग्रामवर तिचे 194K फॉलोअर्स आहेत. काही दिवसांपूर्वी तिने 'कहंदी है' हे गाणे चाहत्यांसोबत शेअर केले होते, ज्याला खूप पसंती मिळाली आहे.

(नक्की वाचा: Asha Bhosale Granddaughter: आशा भोसलेंची नात आहे बॉलिवूडची सुपरस्टार, 16व्या वर्षीच सलमान खानच्या सिनेमाची ऑफर)

Latest and Breaking News on NDTV
मोहम्मद सिराजसोबत जोडले गेले होते नाव

जनाई भोसलेचा 23वा वाढदिवस प्रचंड चर्चेत राहिला होता. वाढदिवसाच्या पार्टीमध्ये क्रिकेटर मोहम्मद सिराज सहभागी झाला होता, जनाईचा त्याच्यासोबतचा फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. या फोटोमुळे दोघंही रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू झाली. पण जनाई आणि मोहम्मद सिराज यांनी रिलेशनशिपच्या चर्चा फेटाळून लावत त्यांच्यामध्ये भाऊबहिणीचे नातं असल्याचे सांगितले. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com