Asha Bhosale Granddaughter: आशा भोसले या बॉलिवूडच्या अशा एका प्रतिष्ठित कुटुंबातील सदस्य आहेत, ज्यामध्ये एकापेक्षा एक सुपरस्टार्सचा समावेश आहे. त्यांची बहीण लता मंगेशकर यांच्यापासून ते पती आर. डी. बर्मन यांच्यापर्यंत अशा दिग्गज मंडळींनी सिनेसृष्टीमध्ये मोठे योगदान दिले आहे. त्यांची एक नात बॉलिवूडची सुपरस्टार आहे, हे तुम्हाला माहिती आहे का? जिनं केवळ काही वर्षातच हिट आणि ब्लॉकबस्टर सिनेमे देऊन सिनेसृष्टीत स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. तिचे वडील बॉलिवूडचे खलनायक आहेत, ज्यांनी 80च्या दशकापासून आतापर्यंत आपल्या अभिनयाने आणि विनोदी शैलीने चाहत्यांची मने जिंकली आहेत. तुम्ही अगदी बरोबर ओळखलं, आपण श्रद्धा कपूरबाबत बोलत आहोत.

श्रद्धा कपूर आणि आशा भोसले यांचे नाते
श्रद्धा कपूरची आई शिवांगी कोल्हापूरे असून त्यांचे वडील म्हणजे श्रद्धाचे आजोबा पंढरीनाथ कोल्हापूरे होते. पंढरीनाथ कोल्हापूरे हे दीनानाथ मंगेशकर यांचे पुतणे आणि लता मंगेशकर - आशा भोसले यांचे चुलतभाऊ होते. या नात्याने आशा भोसले श्रद्धा कपूरच्या आजी लागतात आणि श्रद्धा त्यांच्यासोबतचे फोटो नेहमी शेअर करत असते.
(नक्की वाचा: Asha Bhosle : यशस्वी होण्यासाठी शिक्षण किती महत्त्वाचं? आशा भोसलेंचं Qualification पाहून तुम्हीही थक्क व्हाल!)

श्रद्धा कपूरचे यशस्वी करिअर
ज्येष्ठ अभिनेते शक्ती कपूर यांची मुलगी श्रद्धा कपूर आज बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे. तिने वर्ष 2010 मध्ये 'तीन पत्ती' सिनेमातून आपल्या प्रवासाला सुरुवात केली. त्यानंतर तिने 'एक व्हिलन', 'आशिकी 2', 'एबीसीडी 2', 'बागी', 'रॉक ऑन', 'हाफ गर्लफ्रेंड', 'स्त्री' आणि रणबीर कपूरसोबत 'तू झुठी मैं मक्कार' यासारख्या सिनेमांमध्ये काम केले आहे. तिचा शेवटचा रिलीज झालेला 'स्त्री 2' हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर प्रचंड गाजला असून तो वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या सिनेमांच्या यादीत सामील झाला आहे.
(नक्की वाचा: Asha Bhosle Funeral : आशा भोसलेंवर कधी आणि कुठे होणार अंत्यसंस्कार? मुलगा आनंद भोसलेंने शेअर केले डिटेल्स)

सलमान खानसोबत काम करण्याची संधी
श्रद्धा कपूरला अद्याप सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर काम करण्याची संधी मिळालेली नाही. पण फार कमी लोकांना माहिती आहे की, करिअर सुरू होण्यापूर्वी परदेशात शिक्षण घेत असताना श्रद्धा एका कॉफी शॉपमध्ये काम करायची. त्यावेळी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षीच तिला सलमान खानसोबत मोठ्या पडद्यावर झळकण्याची ऑफर मिळाली होती. पण शिक्षणावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिने ती ऑफर नाकारली होती. आज तिने रणबीर कपूर, राजकुमार राव, अर्जुन कपूर आणि सुशांत सिंह राजपूत यासारख्या मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world