Palaash Muchhal: संगीतकार पलाश मुच्छल वृंदावनातील प्रेमानंद महाराजांच्या सत्संगामध्ये सहभागी झाल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. फोटोमधील व्यक्ती पलाश असल्याचा दावा करण्यात येतोय. स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाशने महाराजांची भेट घेतल्याचे म्हटलं जातंय.
फसवणुकीच्या आरोपांदरम्यान त्याच्या वृंदावनातील भेटीबाबत नेटकरी प्रश्न उपस्थित करतात. एका 'X' युजरने स्क्रीनशॉट शेअर केलाय, ज्यामध्ये पलाश 2 डिसेंबर रोजी धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी असल्याचा दावा करण्यात आलाय. पोस्ट शेअर करत त्याने म्हटलंय की, 2 डिसेंबरच्या प्रेमानंद महाराजांच्या सत्संगमध्ये पलाश मुच्छल दिसत आहे. मला पूर्ण खात्री आहे की मास्क घातलेला माणूस तोच आहे, नवीन PR स्ट्रॅटेजी काय आहे?
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: कोणीही लग्न करणार नाही, वडिलांना मारले टोमणे... स्मृती मानधनाचा धक्कादायक खुलासा)
नेटकरी म्हणतायेत अशा लोकांवर बंदी आणायला हवी
सोशल मीडियावरील या पोस्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलंय. यानंतर सत्संगामध्ये येण्यामागील कारणांसंदर्भातही चर्चा होऊ लागली. आणखी एका युजरने सत्संगातील त्याचे फोटो शेअर करत म्हटलंय की, "हल्ली सर्व सेलिब्रिटींनी प्रेमानंद महाराजांच्या जागेला आपल्या पीआर प्लेचा भाग बनवलंय. स्वतःची प्रतिमा चांगली करण्यासाठी, माध्यमांकडून सहानुभूती मिळवण्यासाठी आणि आध्यात्मिक झाल्याचे दाखवण्यासाठी ही मंडळी येथे येतात. त्यांनी वादग्रस्त प्रतिमा असलेल्या लोकांवर बंदी आणायला हवी".
Palash Muchhal spotted at Premanand Maharaj Ji's satsang on 2nd December. I'm pretty sure the guy in the mask is him even the mehendi on his hands matches
— Albert (@Albertbhaiii) December 2, 2025
New PR Strategy or what?#PalashMuchhal pic.twitter.com/3MEKn3dxFi
लग्नसोहळा पुढे ढकलल्यानंतर मुच्छल 1 डिसेंबर रोजी पहिल्यांदा आई आणि त्याच्या टीमसोबत एअरपोर्ट परिसरात दिसला होता. त्याचा हा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यावेळेस त्याने मीडियाशी बोलणं टाळलं.
(नक्की वाचा: Smriti Mandhana Wedding New Date: स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं या तारखेला होणार लग्न?)
स्मृती आणि पलाशचं लग्न का टळलं?
स्मृती मानधनाचे वडील श्रीनिवास मानधना यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं स्मृती - पलाशचं लग्न पुढे ढकलण्यात आल्याचे म्हटलं जातंय. पलाशला देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. पुढील उपचार त्याने मुंबईमध्ये आणल्यानंतर घेतले. यादरम्यान पलाशने स्मृतीची फसवणूक केल्याची अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरली होती. पण या अफवेबाबत स्मृती आणि पलाश दोघांच्याही अधिकृत प्रतिक्रिया आलेल्या नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

