जाहिरात

तोतया IAS कल्पना भागवत प्रकरण! 'त्या' 11 जणांच्या यादीत ठाकरेंच्या खासदाराचे नाव; कनेक्शन काय?

महिलेच्या खात्यात पैसे देणाऱ्यांच्या ११ जणांच्या यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे.

तोतया IAS कल्पना भागवत प्रकरण! 'त्या' 11 जणांच्या यादीत ठाकरेंच्या खासदाराचे नाव; कनेक्शन काय?

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरच्या एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे गेल्या सहा महिन्यांपासून राहत असलेल्या कल्पना भागवत या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. कल्पना भागवतच्या अटकेनंतर तिचे धक्कादायक पाकिस्तान आणि अफगाणिस्तान कनेक्शन उघडकीस आलं आहे. अशातच आता याप्रकरणात आता आणखी एक मोठा खुलासा झाला असून थेट ठाकरे गटाच्या खासदाराचे कनेक्शन उघडकीस आलं आहे. 

काय आहे प्रकरण?

याबाबत सविस्तर माहिती अशी की, छत्रपती संभाजीनगरच्या बोगस आयएएस कल्पना भागवत प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. कल्पनाने हिंगोलीचे ठाकरे गटाचे खासदार नागेश आष्टीकर यांच्याकडून एक लाख ४५ हजार रुपये घेतल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महिलेच्या खात्यात पैसे देणाऱ्यांच्या ११ जणांच्या यादीमध्ये नागेश पाटील आष्टीकर यांचेही नाव असल्याचे समोर आले आहे.

Police Recruitment : महाराष्ट्र पोलिसात बंपर भरती; अर्ज करण्याची मुदत वाढवली, 50 हजारांहून अधिक पगार!

नागेश आष्टीकरांनी दिले 1 लाख 45 हजार...

 याबाबत स्वतः खासदार आष्टीकर यांनी NDTV मराठीशी बोलताना पैसे दिल्याचे मान्य केले आहे. संबंधित महिला एका कार्यकर्त्यामार्फत भेटली तसेच कधी मंदिर बांधायचे, कधी रुग्णालयासाठी पैसे लागत असल्याचे तिने सांगितले म्हणून पैसे दिले. या पलीकडे माझे काही संबंध नाहीत असेही खासदार आष्टीकर म्हणाले आहे.

कल्पनाने अफगाणी मित्र अशरफच्या भावाच्या पाकिस्तानातील रेस्टॉरंटसाठी कल्पनाने ३ लाख रुपये हवालामार्फत पाठवल्याचे तपासात उघड झाले आहे. ही रक्कम तिने आधी अशरफला दिल्लीत पाठवली. तेथून त्याने मित्राच्या मदतीने ती हवालामार्फत पाकमध्ये पोहोचवली. आता या सर्व प्रकरणात केंद्रीय तपास यंत्रणा देखील सतर्क झाली आहे.

नक्की वाचा - IIT Placement : IIT प्लेसमेंटमधून 20 कंपन्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; विद्यार्थ्यांच्या हितासाठी मोठा निर्णय

Listen to the latest songs, only on JioSaavn.com