Palash Muchhal First Video: स्टार क्रिकेटर स्मृती मानधनासोबतचे लग्न पुढे ढकलल्यानंतर पलाश मुच्छलचा (Palash Muchhal First Video) पहिला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लग्नाच्या घडामोडींदरम्यान तो पहिल्यांदाच प्रसिद्धी माध्यमांसमोर आलाय. संबंधित व्हिडीओ विमानतळ परिसरातील असल्याचं दिसतंय.
पलाश-स्मृतीचं लग्न कधी होणार?
यावेळेस पलाशसोबत त्याची टीम आणि कुटुंब होतं. काही दिवसांपूर्वी डॉक्टरांनी त्याला आराम करण्याचा सल्ला देऊन डिस्चार्ज दिला. पण लग्नासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. ठरल्याप्रमाणे लग्न होईल, असं त्याच्या आईने प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितलं होतं. त्यावेळेस पलाशवर हॉस्पिटलमध्ये औषधोपचार सुरू होते. दुसरीकडे स्मृतीच्या वडिलांची प्रकृती सुधारल्यानंतर लग्नसोहळा पार पडेल, अशी माहिती देण्यात आली होती.
(नक्की वाचा: Smriti Mandhana News: कोणीही लग्न करणार नाही, वडिलांना मारले टोमणे... स्मृती मानधनाचा धक्कादायक खुलासा)
स्मृतीच्या टीमतर्फेही हीच माहिती जारी करण्यात आली होती. श्रीनिवास मानधना यांची प्रकृती ठीक झाल्यानंतरच लग्न होईल, असा निर्णय स्मृती आणि पलाशने घेतला होता. यादरम्यान लग्न मोडल्याच्याही अफवा पसरल्या. पलाशने स्मृतीचा विश्वासघात केल्याचीही अफवा पसरली होती. दरम्यान स्मृतीला फसवल्याच्या आरोपांवर पलाशने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. स्मृतीचंही म्हणणं समोर आलेलं नाही. यामुळे चाहते चिंता व्यक्त करत आहेत.
(नक्की वाचा: Virat Kohli Video: अरे बापरे! भर कार्यक्रमात हसता हसता अचानक विराट कोहलीच्या छातीत दुखू लागलं, नेमकं काय झालं?)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
