Kerala Election 2025: केरळ पंचायत निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या एका महिला उमेदवार आपल्या नावामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांचे नाव सोनिया गांधी असल्याने त्या चर्चेत आल्या आहेत. तसेच त्या भाजपकडून निवडणूक लढवत असल्याने ही निवडणूक देशभर चर्चेत आली आहे. इतकेच नाही तर त्यांचे काँग्रेस कनेक्शनही समोर आले आहे.
काँग्रेस कनेक्शन
'इंडिया टुडे'च्या वृ्त्तानुसार, मल्याळम पोर्टल 'मनोरमा'च्या हवाल्याने सांगितले आहे की, मुन्नारच्या पंचायत निवडणुकीत भाजपने नल्लाथन्नी वॉर्डमधून 34 वर्षीय सोनिया गांधी यांना तिकीट दिले आहे. त्यांचा जन्म स्थानिक काँग्रेस नेते दुरे राज यांच्या घरी झाला होता. राज आता हयात नाहीत. तथापि, लग्नानंतर परिस्थिती बदलली, कारण भाजप उमेदवार सोनिया गांधी यांचा विवाह भाजप नेत्याशी झाला.
त्यांचे पती सुभाष भाजपचे पंचायत महासचिव आहेत आणि त्यांनी ओल्ड मुन्नार मुलक्कड येथून पोटनिवडणूक देखील लढवली आहे. लग्नानंतर काही काळानंतर सोनिया गांधी देखील भाजपमध्ये सक्रिय झाल्या होत्या. त्या त्यांची पहिली निवडणूक लढत आहे. त्यांचा सामना काँग्रेसच्या उमेदवार मंजुला रमेश आणि सीपीआयएमच्या नेत्या वालरमति यांच्याशी होणार आहे.
(नक्की वाचा- Cute VIDEO: मुलीने दाखवली 'कोरियन हार्ट' साईन; वडिलांच्या रिअॅक्शनने जग जिंकलं, व्हिडीओ व्हायरल)
90 वर्षांचे उमेदवार मैदानात
या पंचायत निवडणुकीत कोचीमधील असमन्नूर गावात 90 वर्षीय वृ्द्ध उमेदवारही सहभागी झाले आहेत. नारायणन नायर असं त्यांचं नाव आहे. नारायणन हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत. हातात काळी बॅग घेऊन हळू हळू चालत, घराघरात जाऊन थरथरत्या आवाजात लोकांना आपल्यासाठी मत देण्याचं ते आवाहन करत आहेत.
(नक्की वाचा- Shocking! प्रेमविवाहानंतर हुंड्यासाठी छळ, IAS अधिकाऱ्याच्या मुलीने संपवलं जीवन)
केरळ पंचायत निवडणूक
केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यांत 9 आणि 11 डिसेंबर रोजी होणार आहेत, ज्याचा निकाल 13 डिसेंबरला जाहीर होईल. यात 941 ग्रामपंचायती, 152 ब्लॉक पंचायती, 14 जिल्हा पंचायती, 87 नगरपालिका आणि 6 महापालिका यांचा समावेश आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world