Virat Kohli: वाह! लाईफ हो तो ऐसी! विराट-अनुष्काने मुंबईत खरेदी केले आलिशान अपार्टमेंट, किंमत ऐकून व्हाल थक्क

Virat Kohli Versova Apartment: विराट कोहली आणि अनुष्का शर्माने मुंबईतील वर्सोवा भागात कोट्यवधी रुपयांचे आलिशान सी-फेसिंग अपार्टमेंट खरेदी केले आहे. जाणून घ्या या नव्या घराविषयी सविस्तर माहिती...

जाहिरात
Read Time: 2 mins
"Virat Kohli Anushka Sharma New House: विराट कोहली आणि अनुष्का शर्माच्या नव्या आलिशान घराची चर्चा"

Virat Kohli Versova Apartment: बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहली पुन्हा एकदा त्यांच्या नवीन घरामुळे चर्चेत आले आहेत. दोघांनी मुंबईतील वर्सोवा भागात आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या घराची किंमत 18.29 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. विशेष बाब म्हणजे या दोघांच्या मालकीच्या आधीपासूनच अनेक महागड्या प्रॉपर्टीज आहेत. अशा परिस्थितीत नवीन घर खरेदी केल्याची बातमी समोर येताच चाहत्यांमध्ये त्यांच्या लक्झरी लाइफस्टाइलची चर्चा पुन्हा एकदा रंगू लागली आहे.

समुद्रासमोर खरेदी केले आलिशान अपार्टमेंट

रिपोर्ट्सनुसार अनुष्का आणि विराटने मुंबईतील वर्सोवा येथील गोदरेज स्कायशोर प्रोजेक्टमध्ये नवीन अपार्टमेंट खरेदी केले आहे. हा फ्लॅट 2,644 स्क्वेअर फूट परिसरात पसरलेला असून त्याची किंमत 18.29 कोटी रुपये आहे. या घरासोबत तीन कार पार्किंग आणि 316 स्क्वेअर फूटची अधिकची जागाही मिळाली आहे. सर्वात विशेष बाब म्हणजे याच्या बाल्कनीतून समुद्राचा सुंदर नजारा दिसतो.

Advertisement

घरासोबत कोट्यवधींची स्टॅम्प ड्युटीही भरली

रजिस्ट्रेशनशी संबंधित कागदपत्रांनुसार, या प्रॉपर्टीचे रजिस्ट्रेशन 21 जुलै 2026 रोजी झाले. यासाठी या दाम्पत्याने 30 हजार रुपये रजिस्ट्रेशन फी आणि सुमारे 1.09 कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी भरली. या हिशेबाने या घराची किंमत सुमारे 69,159  रुपये प्रति स्क्वेअर फूट पडते.

आधीपासूनच आहेत अनेक आलिशान घरे

अनुष्का आणि विराटची ही पहिलीच मोठी प्रॉपर्टी नाही. गुरुग्रामच्या डीएलएफ फेज-1 मध्ये दोघांचा सुमारे 10,000 स्क्वेअर फूटचा आलिशान बंगला आहे, ज्याची किंमत सुमारे 80 कोटी रुपये सांगितली जाते. याशिवाय अलिबागमध्येही दोघांनी अनेक एकर जागा खरेदी केली होती, जिथे नंतर एक सुंदर व्हिला बांधण्यात आला. या व्हिलामध्ये स्विमिंग पूल, मॉडर्न किचन, गार्डन आणि अनेक लक्झरी सुविधा उपलब्ध आहेत.

(नक्की वाचा: Ajinkya Rahane: ब्रेकिंग! अजिंक्य रहाणेचा क्रिकेटला अलविदा; सर्व स्तरांतून निवृत्तीची घोषणा)

लग्न, मुले आणि लंडनची चर्चा

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी वर्ष 2017 मध्ये इटलीमध्ये लग्न केले होते. दोघांना दोन मुले आहेत, मुलगी वामिका आणि मुलगा अकाय. गेल्या काही काळापासून अशा बातम्याही समोर येत आहेत की, दोघेही भविष्यात मुलांचे शिक्षण आणि संगोपनासाठी लंडनमध्ये स्थायिक होण्याचा प्लॅन करत आहेत. पण आतापर्यंत यावर कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

Advertisement